Join us

Natural farming: नैसर्गिक शेतीसाठी 'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पुढाकार; जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 09:45 IST

Natural farming : नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 'राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियाना' ची अंमलबजावणी राज्यभरात करण्यात येणार आहे. त्यासाठी जालना जिल्ह्याने पुढकार घेतला आहे. वाचा सविस्तर (Natural farming)

Natural farming : नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 'राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियाना'ची अंमलबजावणी राज्यभरात करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून जालना जिल्ह्यातील सुमारे २ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेती  (Natural farming) केली जाणार आहे.

त्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्माच्या वतीने देण्यात आली. जालना जिल्ह्यातील २७०० हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्यासाठी ५४ गटांची स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.  (Natural farming)

तालुक्यातील क्लस्टर

* नैसर्गिक शेती क्लस्टरमध्ये दरेगाव, पोकळ वडगाव, गणेशपूर, मौजपुरी, रेवगाव, चितळी पुतळी, मोतीगव्हाण, वझर या गावांचा समावेश आहे.

* ८ गावे कृषी विभागाकडून जिल्ह्यातील आठ गावांचा नैसगिक शेती क्लस्टरमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

नैसर्गिक शेतीचा उद्देश

* शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीकडे वळण्यासाठी शासन राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाची अंमलबजावणी करीत आहे.

* नैसर्गिक शेती ही रासायनिक विरहित पारंपरिक शेती पद्धत आहे. पिके, झाडे आणि पशुधन यांना जैवविविधतेसह एकत्रित करते.

* नैसर्गिक शेतीमुळे आपली जैवविविधता टिकून राहावी, हा या मागचा उद्देश आहे.

जिल्हाभरात आठ क्लस्टर

जिल्हाभरातील एकूण ८ क्लस्टरमध्ये २,७०० हेक्टर क्षेत्राची विभागणी करण्यात आली आहे. जालना आणि भोकरदन तालुक्यात सर्वाधिक आठ क्लस्टर असून या क्लस्टरमध्ये सुमारे ४०० हेक्टर जमीन नैसर्गिक शेती खाली येणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.

तालुकानिहाय समूह स्थापनेचे उद्दिष्ट

तालुकासमूह संख्याहेक्टर क्षेत्र
जालना४००
बदनापूर३००
भोकरदन४००
जाफराबाद३००
परतूर३००
मंठा३५०
अंबड३५०
घनसावंगी३००
एकूण ५४२७००

हे ही वाचा सविस्तर :Swarnima Loan Scheme: महिलांसाठी केंद्र सरकारची 'ही' कर्ज योजना आहे फायदेशीर वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतीशेतकरीसरकारी योजनाकेंद्र सरकार