Join us

National Mission on Natural Farming : नैसर्गिक शेतीसाठी केंद्र सरकारने सुरु केली ही नवीन योजना; कसा मिळणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 11:11 IST

National Mission on Natural Farming NMNF पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालया अंतर्गत, केंद्र प्रायोजित स्वतंत्र योजना म्हणून, नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग (एनएमएनएफ), अर्थात नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय मिशनचा शुभारंभ करायला मंजुरी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालया अंतर्गत, केंद्र प्रायोजित स्वतंत्र योजना म्हणून, नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग (एनएमएनएफ), अर्थात नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय मिशनचा शुभारंभ करायला मंजुरी दिली.

१५ व्या वित्त आयोगापर्यंतचा (२०२५-२६) या योजनेसाठी एकूण रु. २४८१ कोटी (भारत सरकारचा वाटा - रु. १५८४ कोटी, राज्याचा वाटा - रु.८९७ कोटी) इतका खर्च नियोजित आहे.

देशभरात नैसर्गिक शेतीला मिशन मोडमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी, भारत सरकारने कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालया अंतर्गत केंद्र प्रायोजित स्वतंत्र योजना म्हणून नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंगची (एनएमएनएफ) सुरुवात केली आहे.

सर्वांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळावे, यासाठी नैसर्गिक शेतीच्या पद्धतींना प्रोत्साहन देणे, हे एनएमएनएफ चे उद्दिष्ट आहे. मिशनची आखणी, शेतकऱ्यांना लागवडीचा खर्च कमी करण्यासाठी आणि बाहेरून खरेदी केलेल्या साहित्यावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मदत होईल, हे लक्षात घेऊन करण्यात आली आहे.

नैसर्गिक शेतीमुळे मातीची निरोगी परिसंस्था तयार होईल, जैवविविधतेला चालना मिळेल आणि स्थानिक शेतीमध्ये पर्याय वाढवण्यासाठी वैविध्यपूर्ण पीक पद्धतींना प्रोत्साहन मिळेल. नैसर्गिक शेतीचे हे फायदे आहेत.

पुढील दोन वर्षांत, इच्छुक असलेल्या ग्रामपंचायतींमधील १५,००० क्लस्टरमध्ये एनएमएनएफ ची अंमलबजावणी केली जाईल, आणि १ कोटी शेतकऱ्यांना त्याचा लाभ देऊन, ७.५ लाख हेक्टर क्षेत्रात नैसर्गिक शेती (NF) सुरू केली जाईल.

नैसर्गिक शेतीचा सराव करणारे शेतकरी, SRLM/PACS/FPO इ. क्षेत्रांना प्राधान्य दिले जाईल. त्याचबरोबर, शेतकऱ्यांच्या वापरासाठी तयार नैसर्गिक शेती साधनांची सहज उपलब्धता प्रदान करण्यासाठी गरजेवर आधारित १०,००० जैव-साधन सामुग्री केंद्रे (BRCs) स्थापन केली जातील.

एनएमएनएफ अंतर्गत, कृषी विज्ञान केंद्रे (KVK), कृषी विद्यापीठे (AUs) आणि शेतकऱ्यांच्या शेतात सुमारे २००० नैसर्गिक शेती (NF) मॉडेल प्रात्यक्षिक फार्म स्थापन केले जातील, आणि या ठिकाणी अनुभवी आणि प्रशिक्षित शेतकरी मास्टर ट्रेनर्स नियुक्त केले जातील.

इच्छूक शेतकऱ्यांना त्यांच्या गावाजवळील मॉडेल प्रात्यक्षिक फार्ममध्ये NF पद्धतींचे प्रशिक्षण दिले जाईल. १८.७५ लाख प्रशिक्षित इच्छुक शेतकरी त्यांचे पशुधन वापरून किंवा बीआरसी कडून खरेदी करून जीवनामृत, बीजामृत इत्यादी साहित्य तयार करतील.

क्लस्टर्समधील इच्छुक शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी  ३०,००० कृषी सखी/सीआरपी तैनात केले जातील.

शेतकऱ्यांना त्यांच्या नैसर्गिक शेती उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी एक सोपी प्रमाणपत्र प्रणाली आणि समर्पित सामायिक ब्रँडिंग प्रदान केले जाईल. NMNF अंमलबजावणीचे ताजे जिओ-टॅग आणि मॉनिटरिंग ऑनलाइन पोर्टलद्वारे केले जाईल.

स्थानिक पशुधनाची संख्या वाढवणे, केंद्रीय पशुपालन फार्म/प्रादेशिक चारा केंद्रांवर NF मॉडेल प्रात्यक्षिक फार्मचा विकास, स्थानिक शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडण्यासाठी जिल्हा/ब्लॉक/GP स्तरावर बाजार जोडणी प्रदान करणे.

यासारख्या योजनांद्वारे APMC (कृषी उत्पन्न बाजार समिती) मंडई, हाट, डेपो या ठिकाणी भारत सरकार/राज्य सरकारे/राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सध्या लागू असलेल्या योजना आणि प्रोत्साहन योजनांचा लाभ दिला जाईल.

याव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांना RAWE कार्यक्रमाद्वारे आणि NF साठी समर्पित पदवीपूर्व, पदव्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रमांच्या माध्यमातून NMNF शी जोडले जाईल.

टॅग्स :शेतीकेंद्र सरकारसेंद्रिय शेतीशेतकरीसरकारसरकारी योजनानरेंद्र मोदी