Join us

लाईट बिलावरील नावातील बदल दुरुस्ती होणार आता ७ दिवसांच्या आत; अर्जांना स्वयंचलित मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 10:55 IST

दर्जेदार व तत्पर ग्राहकसेवेसाठी महावितरणने वीजबिलांच्या ग्राहक नावातील बदल करण्याच्या ऑनलाईन अर्जाना स्वयंचलित मंजुरी देण्यास सुरुवात केली आहे.

पुणे : दर्जेदार व तत्पर ग्राहकसेवेसाठी महावितरणनेवीजबिलांच्या ग्राहक नावातील बदल करण्याच्या ऑनलाईन अर्जाना स्वयंचलित मंजुरी देण्यास सुरुवात केली आहे.

आवश्यक कागदपत्रे अपलोड करून प्रक्रिया शुल्काचा भरणा केल्यानंतर केवळ तीन ते सात दिवसांमध्ये वीजबिलावरील ग्राहक नावामध्ये बदलाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

यापूर्वी या प्रक्रियेस कृती मानकानुसार एक महिन्याचा कालावधी लागत होता. वीजबिलावरील ग्राहक नावात बदल करण्यासाठी नुकतीच ऑनलाईन प्रणाली विकसित व कार्यान्वित करण्यात आली आहे.

खरेदी-विक्री, वारसाहक्क किंवा इतर कारणांमुळे घर किंवा इतर मालमत्तेच्या मालकीमध्ये बदल झाल्यानंतर वीजबिलाच्या ग्राहक नावात बदल करण्यासाठी अर्ज करण्यात येतो.

या प्रक्रियेसाठी महावितरण मोबाईल अ‍ॅप व संकेतस्थळावर वीजग्राहकांना 'लॉग-इन'द्वारे ऑनलाईन अर्ज सादर करणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे व प्रक्रिया शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

ग्राहकांचे अर्ज, छाननी व मंजुरी या प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाच्या कृती मानकांप्रमाणे एक महिन्याचा कालावधी निश्चित आहे.

आता महावितरणकडून या अर्जाना स्वयंचलित मंजुरी मिळत असल्याने नावात बदल करण्याची कार्यवाही केवळ तीन ते सात दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे.

ग्राहक नावात बदल करण्याचा ऑनलाईन अर्ज व अपलोड केलेल्या कागदपत्रांची संबधित उपविभाग कार्यालयाकडून तपासणी होईल. ग्राहक नावात बदल करण्याच्या अर्जाना स्वयंचलित मंजुरी मिळणार आहे.

अधिक वाचा: रब्बी हंगामातील 'या' सहा पिकांसाठी विमा अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु; जाणून घ्या सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Electricity Bill Name Change Approved in 7 Days; Automatic Approval

Web Summary : MahaVitaran streamlines electricity bill name changes with online applications and automatic approvals. The process, previously taking a month, now completes in 3-7 days after document upload and fee payment. This benefits property owners due to sales, inheritance, or other reasons, simplifying the application process via their app and website.
टॅग्स :वीजबिलमहावितरणऑनलाइनमोबाइल