Join us
Daily Top 2Weekly Top 5

नागवडेचा हंगाम १० फेब्रुवारीपर्यंत चालणार; ऊस बिलाचा पहिला हप्ता कितीने दिला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 15:02 IST

नागवडे सहकारी साखर कारखान्याने ५१व्या गळीत हंगामात ४ लाख ७२ हजार ३४० मेट्रिक टन ऊस गाळप केले असून, सरासरी रोज साडेसहा मेट्रिक टन उसाचे गाळप होत आहे.

नागवडे सहकारी साखर कारखान्याने ५१व्या गळीत हंगामात ४ लाख ७२ हजार ३४० मेट्रिक टन ऊस गाळप केले असून, सरासरी रोज साडेसहा मेट्रिक टन उसाचे गाळप होत आहे.

गाळप हंगाम अजून एक महिना म्हणजे १० फेब्रुवारीपर्यंत चालणार असून सभासद शेतकऱ्यांनी थोडे थांबून आपला ऊस इतर कारखान्यांना न देता नागवडे कारखान्यास देण्याचे आवाहन कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी केले.

नागवडे कारखान्याने यंदाच्या हंगामात उच्चांकी ३१५० रुपये दर जाहीर केला आहे. त्यापैकी पहिला हप्ता ३ हजार रुपये अदा केला आहे.

कारखान्याचे संस्थापक दिवंगत शिवाजीराव बापू नागवडे यांनी सातत्याने सभासद शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याची भूमिका घेतली.

त्यांच्या विचारांचा व संस्काराचा वारसा ठेवून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंतच्या वाटचालीत सभासद शेतकऱ्यांनी चांगले सहकार्य केले.

अधिक वाचा: सिमेन सॉर्टिंग तंत्राने घडवला यशाचा गोठा; गलांडवाडीच्या संदीप शितोळेंच्या दुग्धव्यवसायाचा प्रेरणादायी प्रवास

English
हिंदी सारांश
Web Title : Nagawade Sugar Mill Season Extended; First Installment Announced

Web Summary : Nagawade Sugar Mill's season extends to February 10th, having crushed 4,72,340 metric tons of sugarcane. Farmers are urged to supply cane to Nagawade. The mill declared ₹3150 rate, paying ₹3000 as the first installment, honoring founder's legacy.
टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीश्रीगोंदाबँक