दादासाहेब गलांडे
पैठण तालुक्यातील इसारवाडीमध्ये ५५ एकर क्षेत्रांवर मराठवाड्यातील मोसंबी (Mosambi) उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोसंबी संशोधन केंद्र (Citrus Research Center) उभारले जात आहे. येत्या पाच महिन्यांत त्याचे काम पूर्ण होणार आहे.
या प्रकल्पात दरवर्षी किमान दोन ते अडीच लाख दर्जेदार मोसंबीची (Mosambi) रोपे तयार केली जाणार असून, ती रोपे राज्यातील शेतकऱ्यांना लागवडीसाठी दिली जाणार आहेत. यामुळे हे केंद्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. (Citrus Research Center)
राज्यात ५८ हजार हेक्टर क्षेत्रावर मोसंबी लागवड करण्यात आलेली असून, यापैकी मराठवाड्यात ४० ते ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर मोसंबीचे (Mosambi) उत्पादन शेतकरी घेतात. यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांत सर्वाधिक ३८ हजार हेक्टर क्षेत्रावर मोसंबीचे उत्पादन घेतले जाते. (Citrus Research Center)
यामुळे मराठवाड्याच्या दृष्टीने मोसंबीसाठी (Mosambi) शाश्वत उत्पादन प्रक्रिया तसेच निर्यातीसाठी क्लस्टर निर्माण करण्याची गरज होती. हीच गरज लक्षात घेऊन राज्यातील पहिले स्वतंत्र मोसंबी संशोधन केंद्र इसारवाडी (Citrus Research Center) येथे उभारले जात आहे.
हे केंद्र ५५ एकर क्षेत्रावर उभारण्यासाठी २०२३ मध्ये त्याला मंजुरी मिळाली. या केंद्राचे बांधकाम ७० टक्के पूर्ण झाले आहे. येत्या पाच महिन्यांत त्याचे काम पूर्ण होणार आहे. या प्रकल्पातून दरवर्षी किमान दोन ते अडीच लाख दर्जेदार रोपे तयार केली जाणार असून, ती रोपे राज्यातील शेतकऱ्यांना लागवडीसाठी (Cultivation) दिली जाणार आहेत. (Citrus Research Center)
३९.५ कोटींचा निधी मंजूर
हे केंद्र उभारण्यासाठी २०२३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात ३९.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असून, याकरिता तत्कालीन रोजगार हमी तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला होता.
या केंद्रात उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका तयार करून मोसंबी दर्जेदार रोपे तयार केली जाणार आहेत. ही रोपे शेतकऱ्यांना लागवडीसाठी दिली जातील. याशिवाय लागवडीपासून ते काढणीपर्यंत मार्केटिंग, एक्सपोर्टसह मार्गदर्शन शेतकऱ्यांना या केंद्रात केले जाणार आहे. न्यू शेलार, काटोल गोल्ड, फुलेमोसंबी, वॉशिंग्टन नवल, सातगुडी, मालटाब्लड रेड, जावा या वानाची मोसंबीची रोपे या केंद्रात तयार केली जाणार आहेत. - रामनाथ कार्ले, मुख्य कार्यकारी अधिकारी, मोसंबी संशोधन केंद्र
या केंद्रात शेतकरी प्रशिक्षण भवन, अत्याधुनिक प्रयोगशाळा, शेतकरी निवास, कर्मचारी निवास, शीतगृह (कोल्ड स्टोअरेज), अवजारे बँक, गोडाऊन या सुविधा राहणार आहेत. या प्रकल्पासाठी आ. विलास भुमरे यांच्या प्रयत्नाने पंधरा कोटी रुपयांचा निधी नुकताच मिळाला आहे. - राजेंद्र बोरकर, सहाय्यक अभियंता, मोसंबी संशोधन केंद्र
हे ही वाचा सविस्तर : Avkali Paus: शेतकऱ्यांना अवकाळीची धास्ती; वातावरणातील बदलाची चिंता वाचा सविस्तर