राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये ५७.४८ टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे अध्यापन, प्रशासकीय कामकाज करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
प्रभारींच्या खांद्यावर गाडा हाकला जात आहे. कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने आकृतिबंधाची शिफारस केली नसल्याने भरती प्रक्रिया रखडल्याची माहिती आहे.
विदर्भातील कृषी क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ६३ टक्के जागा रिक्त आहेत. यामध्ये अत्यंत कळीच्या पदांचा समावेश असल्याने दैनंदिन कामकाजात अडचणी येतात.
दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात ४०.९८ टक्के जागा रिक्त आहेत. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ६६.१६ टक्के जागा रिक्त आहेत. अ, क आणि ड वर्गातील जागा रिक्त आहेत.अशी आहे रिक्त पदांची स्थिती
विद्यापीठ | मंजूर पदे | भरलेली पदे | रिक्त पदे |
वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी | २,९७२ | १,०८२ | १,८९० |
महात्मा फुले विद्यापीठ, राहुरी | ४,५३३ | २,०३५ | २,४९८ |
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला | ३,४४७ | २,१७३ | १,२७४ |
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली | १,७५९ | १,०३८ | ७२१ |
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालकांची नुकतीच नियुक्त्ती प्रक्रिया पूर्ण झाली. आकृतिबंध तयार झाल्यानंतर मंत्रालयात मान्यतेसाठी येईल. विधि व न्याय विभाग आणि वित्त विभागाची मान्यता मिळाल्यानंतर मंजूर होणार आहे. - विकासचंद्र रस्तोगी, प्रधान सचिव, कृषी विभाग
अधिक वाचा: e Pik Pahani : आता पिक पाहणी होणार झटपट; वापरा अपडेटेड व्हर्जनचे 'हे' मोबाईल अॅप