प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेऊन देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक मॉडेल सौर ग्राम निर्माण करण्यासाठी सुरू केलेल्या स्पर्धेसाठी राज्यातील सहा जिल्ह्यातील ६३ गावांची निवड करण्यात आली आहे.
यातील विजेत्या गावाला केंद्र सरकारकडून एक कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. शिवाय स्पर्धेत भाग घेणाऱ्या गावांपैकी सहा महिन्यात सर्वाधिक सौर ऊर्जा क्षमता निर्माण करणाऱ्या गावाची विजेता म्हणून निवड करण्यात येणार आहे.
महावितरणने शंभर गावांना सौर ऊर्जेचा वापर करून ऊर्जा स्वयंपूर्ण बनविण्यासाठीची सौर ग्राम योजना यापूर्वीच सुरू केली आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत १४ गावे सौर ग्राम झाली.
Pradhan Mantri Surya Ghar Yojana आता केंद्र सरकारच्या मॉडेल सौर ग्राम योजनेमुळे गावांना ऊर्जा स्वयंपूर्ण बनविण्यास चालना मिळणार आहे.
मॉडेल सौर ग्राम योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणला राज्यासाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
अशी आहे स्पर्धा
◼️ किमान पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावांना मॉडेल सौर ग्राम योजनेसाठीच्या स्पर्धेत भाग घेण्याची संधी आहे.
◼️ गावे निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे.
◼️ सध्या सहा जिल्ह्यातील ६३ गावांची योजनेसाठी निवड करण्यात आली आहे.
◼️ गावातील पथदिवे सौर ऊर्जेवर चालविणे, गावाची पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर चालविणे अशी कामे सरकारी योजनांचा लाभ घेऊन केली जातील.
◼️ स्पर्धा सहा महिने चालणार आहे.
अधिक वाचा: Tukda Bandi Kayda : शेतजमीन तुकडेबंदी कायदा रद्द होण्याची शक्यता; काय होईल निर्णय? वाचा सविस्तर