Join us
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगात आता शेतकऱ्यांच्या मनासारखं झालं; विहीर व शेततळ्यासाठीच्या आर्थिक मर्यादेत भरीव वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 15:24 IST

mnrega yojana केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) वैयक्तिक कामांसाठी आर्थिक मर्यादेत वाढ केली आहे.

केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) वैयक्तिक कामांसाठी आर्थिक मर्यादा दोन लाखांवरून सात लाखांपर्यंत केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, प्रलंबित कामे आता मार्गी लागणार आहेत.

वैयक्तिक कामासाठीची ७ लाखांपर्यंत मर्यादा मनरेगांतर्गत विहिरी, शेततळे, जमीन विकास अशा वैयक्तिक स्वरूपांच्या कामांसाठी आर्थिक मर्यादा दोन लाखांवरून थेट सात लाख रुपये केली आहे. पैशाची मर्यादा वाढवल्याने कामांचा दर्जा आणखी सुधारणार आहे.

मनरेगा सॉफ्टवेअरमध्ये केली सुधारणामनरेगाच्या सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाढीव सात लाख रुपयांपर्यंतच्या कामांना सॉफ्टवेअरमध्ये मंजुरी देणे व निधीची व्यवस्था करणे शक्य होणार आहे.

आधी ५ वरून २ लाख केली होती मर्यादा◼️ केंद्र सरकारने मनरेगांतर्गत वैयक्तिक कामांची मर्यादा कमी केली होती. पाच लाखांवरून ती दोन लाख करण्यात आली होती.◼️ मात्र, शेतकऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे पुन्हा मर्यादा वाढविण्यात आली आहे.◼️ त्यामुळे शेतकऱ्यांची प्रलंबित कामे मार्गी तर लागतीलच शिवाय कामाचा दर्जाही आणखी सुधारणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

विहिरी, शेततळ्यासह वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी ६८ कामे राखीव◼️ मनरेगा योजनेमध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी ६८ प्रकारची वैयक्तिक कामे राखीव आहेत.◼️ यामध्ये विहिरी, शेततळे, जमीन समतलीकरण, जलसंधारण, पाणी व्यवस्थापन या कामांचा समावेश आहे.◼️ कामाची मर्यादा वाढवल्याने समाधान व्यक्त होत आहे.

आता कामांना येणार गती◼️ पावसाळ्यातील चार महिने मनरेगाच्च्या कामाची गती मंदावते.◼️ परंतु आता कामांना गती येणार आहे. फेब्रुवारीपासून सिंचन विहिरीची कामे अधिक गतीने सुरू होतात.◼️ वैयक्तिक कामांसाठी मर्यादा वाढवणे हे अत्यंत आवश्यक होते.◼️ गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या कामांना यामुळे गती मिळणार आहे.◼️ लाभार्थ्यांना त्यांच्या विहिरी, शेततळे, जमीन विकास या कामांचा फायदा होणार आहे.

अधिक वाचा: सोमेश्वर कारखान्याकडून उशिरा तुटणाऱ्या उसाला अनुदान जाहीर; कोणत्या महिन्यात किती अनुदान?

टॅग्स :सरकारी योजनासरकारकेंद्र सरकारशेतकरीशेतीपाणी