Lokmat Agro >शेतशिवार > Agriculture Minister : अखेर खातेवाटप जाहीर! कुणाला मिळालं कुठलं खातं; वाचा सविस्तर

Agriculture Minister : अखेर खातेवाटप जाहीर! कुणाला मिळालं कुठलं खातं; वाचा सविस्तर

MLA Manikrao Kokate is the new Agriculture Minister! Will there be a change of officers? | Agriculture Minister : अखेर खातेवाटप जाहीर! कुणाला मिळालं कुठलं खातं; वाचा सविस्तर

Agriculture Minister : अखेर खातेवाटप जाहीर! कुणाला मिळालं कुठलं खातं; वाचा सविस्तर

Agriculture Minister राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार अखेर झाला असून यामध्ये माणिकराव कोकाटे हे नवे कृषीमंत्री झाले आहेत.

Agriculture Minister राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार अखेर झाला असून यामध्ये माणिकराव कोकाटे हे नवे कृषीमंत्री झाले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

Agriculture Minister : राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार अखेर झाला असून मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रत्येक विभागाला स्वतंत्र मंत्री मिळाले आहेत. तर यामध्ये माणिकराव कोकाटे हे राज्याचे  नवे कृषीमंत्री झाले आहेत. 

माणिकराव कोकाटे हे सिन्नर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंत्री असून त्यांची आमदारकीची ही सहावी टर्म आहे. त्यांना नाशिक जिल्ह्यातील दूरदृष्टीचा नेता समजले जाते. दुष्काळावर मात करण्यासाठी त्यांना साडेतेरा हजार कोटींचा नदीजोड प्रकल्प मंजूर करून घेतला होता.

त्यांनी याआधी नाशिक जिल्हा परिषद, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती, सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, नाशिक जिल्हा देखरेख संघाचे चेअरमन, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, नाशिक सहकारी साखर कारखान्यावर बँक प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. सहकार क्षेत्रात त्यांचा चांगला अभ्यास आहे. 


कुणाला मिळाले कोणते खाते?

देवेंद्र फडणवीस - गृह
अजित पवार - अर्थ
एकनाथ शिंदे - नगर विकास, गृह निर्माण

1.चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
2.राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
3.हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
4.चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
5.गिरीश महाजन – आपत्ती व्यवस्थापन (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
6.गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
7.गणेश नाईक – वन
8.दादाजी भुसे – शालेय शिक्षण
9.संजय राठोड – माती व पाणी परीक्षण
10.धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
11.मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
12.उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
13.जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल
14.पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
15.अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय
16.अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
17.शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
18.आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
19.दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
20.अदिती तटकरे – महिला व बालविकास
21.शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम
22.माणिकराव कोकाटे – कृषी
23.जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
24.नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
25.संजय सावकारे – कापड
26.संजय शिरसाट – सामाजिक न्याय
27.प्रताप सरनाईक – वाहतूक
28.भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन
29.मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
30.नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
31.आकाश फुंडकर – कामगार
32.बाबासाहेब पाटील – सहकार
33.प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राज्यमंत्री (State Ministers )

34.माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
35.आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
36.मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
37.इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
38.योगेश कदम – गृहराज्य शहर
39.पंकज भोयर – गृहनिर्माण,

Web Title: MLA Manikrao Kokate is the new Agriculture Minister! Will there be a change of officers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.