मिलेट्स म्हणजेच भरडधान्ये किंवा तृणधान्यांचे मानवी आहारामध्ये खूप महत्त्व आहे. भारतातील लोकांचे पारंपारिक अन्न हेच होते. पण हरितक्रांतीनंतर आपल्याकडे गहू आणि तांदळाचे आहारातील प्रमाण वाढत गेले आणि भरडधान्याचे प्रमाण कमी होत गेले. २०२३ हे वर्ष सर्वांनी आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष म्हणून साजरे केले. त्यानंतर मिलेट्सचे महत्त्व पुन्हा जगाला कळाले. पण मिलेट्समध्ये असलेल्या ८ ते १० धान्यांची ओळख आपल्याला आहे का?
ज्वारी, बाजरी, रागी किंवा नाचणी, सावा, वरई, कांगणी किंवा राळ, भगर, सामा किंवा कोराळे, कोद्रा हे प्रमुख भरडधान्ये आहेत. या भरडधान्यांची सखोल माहिती जाणून घेऊयात.
ज्वारी (Sorghum Millets)
* ज्वारी हे तृणधान्य असून ते ग्लुटेनमुक्त व मोठ्या प्रमाणात तंतुमय पदार्थ असणारे धान्य आहे.* ज्वारी ही प्रथिने, थायमिन, नियासिन व जीवनसत्व बी-६ यांचा चांगला स्त्रोत आहे.* ज्यांना ग्लुटेनचा त्रास होतो किंवा ज्यांना लहान आतड्याचा विकार आहे अशा लोकांसाठी ज्वारी हा एक चांगला पर्याय आहे.* ज्वारी हा अँटीऑक्सिडंटस घटकांचा एक चांगला स्त्रोतदेखील असून त्यामुळे कर्करोग व इतर रोगांपासून संरक्षण होण्यास मदत होऊ शकते.* ज्वारीमध्ये मॅग्रेशियम, पोटॅशियम व जस्त या खनिजांचे देखील प्रमाण भरपूर असते. जे लोक पौष्टिक आहार खाण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांच्यासाठी ज्वारी हा एक चांगला पर्याय आहे.
(माहिती संदर्भ - महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)