Join us
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याचा मार्ग मोकळा, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळणार २५% अग्रिम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 10:06 IST

विमा कंपन्यांचे अपील फेटाळले : ५ हजार गावांना लाभ

विमा कंपन्यांनी पावसाच्या खंडाबाबत विभागीय आयुक्तांकडे केलेले अपील फेटाळण्यात मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांमधील सुमारे ५ हजार गावांतील शेतकऱ्यांना विम्याची २५ टक्के अग्रिम रक्कम दिवाळीपूर्वी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मराठवाड्यात जूनपासून सप्टेंबर अखेरपर्यंत १२२ दिवसांत सरासरी ४० दिवसच पाऊस बरसला. ऑगस्ट महिना पूर्णत: कोरडा गेला, तर २५० मंडळांत २१ दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड होता. नांदेड आणि हिंगोली जिल्हा वगळता उर्वरित जिल्ह्यांत पावसाने दडी मारल्याने सुमारे ४० लाख हेक्टरवरील कापूस, मका, सोयाबीन पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम झाला आहे.

१५% पावसाची तूट

■ हवामान विभागाच्या दृष्टीने पावसाळा ३० सप्टेंबर रोजी संपला असून, चार महिन्यांत मराठवाड्यात ८५.५ टक्के पाऊस झाला आहे. आठपैकी नांदेड व हिंगोली दोन जिल्ह्यांत समाधानकारक पाऊस झाला, तर उर्वरित सहा जिल्ह्यांत सामान्यतः सरासरीच्या आसपास पाऊस झाला.

■ मराठवाड्यात १५ टक्के पावसाची तूट ३० सप्टेंबरपर्यंत आहे. ६७९.५ मि. मी. विभागाची वार्षिक सरासरी आहे. त्यापैकी ५८१.५ मि.मी. पाऊस झाला. मागील वर्षी ११३ टक्के (७६९.७ विभागीय आयुक्त मि.मी.) पाऊस झाला होता.

दिवाळीपूर्वी रक्कम देण्याचा आदेश

मराठवाड्यातील ८१ लाख ११ हजार ३७४ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले आहेत. त्यापोटी २३ हजार ७७६ कोटी ६६ लाख एवढी धाराशिव रक्कम भरली आहे. अपील मराठवाड्यातील पिकांची आल्याने आणेवारी अद्याप ठरलेली नाही. ऑक्टोबर अखेरनंतर उंबरठा सूत्रानुसार आणेवारी ठरेल. बीडमधील अनेक मंडळांतील खंडाबाबत विमा कंपन्यांनी अपील केले होते. इतर जिल्ह्यांतील काही अपील होते. ते सगळे फेटाळण्यात आले. ४६५ मंडळांपैकी ज्याठिकाणी पावसाचा खंड होता तेथील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम विम्याची रक्कम देण्याचा आदेश विमा कंपन्यांना दिला. - मधुकरराजे आर्दड, विभागीय आयुक्त

टॅग्स :पीक विमाशेतकरीमराठवाडापीक