Join us

Maize Crop : मक्याचे इतके लाख क्विंटल उत्पन्न; तरी होईना प्रक्रिया उद्योगाची उभारणी जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 10:54 IST

Maize Crop : कन्नड तालुक्यात दरवर्षी ३५ ते ४० हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकरी मक्याची लागवड करतात. यातून दरवर्षी साडेतीन ते चार लाख क्विंटलपेक्षा अधिक मक्याचे उत्पादन निघते. परंतु येथे प्रक्रिया उद्योग नसल्याने शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात मका विक्री करावी लागत आहे. (Maize Crop)

प्रवीण जंजाळ

कन्नड तालुक्यात दरवर्षी ३५ ते ४० हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकरी मक्याची लागवड करतात. यातून दरवर्षी साडेतीन ते चार लाख क्विंटलपेक्षा अधिक मक्याचे उत्पादन निघते. (Maize Crop)

तरी देखील तालुक्यात आतापर्यंत एकही मका प्रक्रिया उद्योग उभारण्यात आलेला नाही. यामुळे मक्याला समाधानकारक भाव मिळत नाही. यासाठी सुशिक्षित तरुणांनी आता मका प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करावेत, जेणेकरून तरुणांना रोजगार मिळेल आणि शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणार आहे. (Maize Crop)

२०२२ ते २०२३ या वर्षात तालुक्यात ३४ हजार १९९ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी मक्याची लागवड केली होती. यातून ४ लाख ३५ हजार ९७क्विंटल मक्याची उत्पन्न झाले होते. २०२३-२०२४ या वर्षात ३६ हजार १७८ हेक्टर क्षेत्रावर मक्याची लागवड होऊन त्यातून ३ लाख ३२ हजार ६८५ क्विंटल उत्पादन झाले होते.  (Maize Crop)

२०२४-२५ या वर्षात मागील वर्षीच्या तुलनेत ८ हजार हेक्टर क्षेत्राची वाढ होऊन ४२ हजार १५४ हेक्टर क्षेत्रावर मका लागवड करण्यात आली होती. त्यातून ३१ मार्च २०२५ अखेरपर्यंत ३ लाख ४०३ क्विंटल मक्याचे उत्पादन झाले. कन्नड तालुक्यात मक्याचा भाव सध्या प्रति क्विंटल २,२७२ ते २,४४० रुपये दरम्यान मिळत आहे, अशी माहिती कन्नड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सूत्राने दिली. (Maize Crop)

तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड होत असून देखील आतापर्यंत एकही मका प्रक्रिया उद्योग उभारण्यात आला नसल्याने मक्याला समाधानकारक भाव मिळत नाही. 

सुशिक्षित तरुणांनी मका प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करावेत, जेणेकरून रोजगार वाढणार असून शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. ३४ हजार १९९ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी २०२२ ते २०२३ या वर्षात कन्नड तालुक्यात मक्याची लागवड केली होती.

शेतकरी या ठिकाणी विक्री करतात मका

ज्या ठिकाणी मक्याला जास्त मिळतो, त्या ठिकाणी शेतकरी मक्याची विक्री करतात. कन्नडमधील बाजार समितीसह चिंचोली लिंबाजी, भराडी, बोरगाव (ता. सिल्लोड), बोलठाण (ता. नांदगाव), लासूर स्टेशन येथील मार्केटमध्ये मक्याची विक्री केली जाते.

तालुक्यात सध्या गव्हावर प्रक्रिया उद्योग सुरू आहेत; परंतु मकावर प्रक्रिया उद्योग कुणी सुरू केलेला नाही. मक्याचे होत असलेले उत्पन्न बघून भविष्यात मका प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा मानस आहे. हा उद्योग सुरू झाल्यास निश्चित शेतकऱ्यांना, तरुणांना मोठा फायदा होईल. - मनोज पवार, उद्योजक, कन्नड

तालुक्यात दरवर्षी तीन ते साडेतीन लाख क्विंटल पेक्षा अधिक मक्याचे उत्पादन निघते, ही बाब खरी आहे. तरी देखील तालुक्यात एक मका प्रक्रिया उद्योग नाही. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत १ कोटी रुपयांपर्यंत बँकेकडून हा उद्योग उभारण्यासाठी कर्ज मिळू शकते. त्यावर ३०% सबसिडी मिळते. त्यामुळे तरुणांनी यासाठी पुढाकार घेऊन मका प्रक्रिया उद्योग सुरू करावेत. - संदीप शिरसाठ, तालुका कृषी अधिकारी, कन्नड

हे ही वाचा सविस्तर : Umed: बचतगटाच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरणावर भर; वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रमकापीकशेतकरीशेती