Lokmat Agro >शेतशिवार > महावितरणकडून सौर ऊर्जानिर्मितीसाठी मिळणार मोफत सोलर नेट मीटर; कसा मिळेल लाभ

महावितरणकडून सौर ऊर्जानिर्मितीसाठी मिळणार मोफत सोलर नेट मीटर; कसा मिळेल लाभ

Mahavitaran will provide free solar net meters for solar energy generation; How to get the benefits | महावितरणकडून सौर ऊर्जानिर्मितीसाठी मिळणार मोफत सोलर नेट मीटर; कसा मिळेल लाभ

महावितरणकडून सौर ऊर्जानिर्मितीसाठी मिळणार मोफत सोलर नेट मीटर; कसा मिळेल लाभ

PM Surya Ghar Yojana महावितरणने सोलर नेट मीटर मोफत पुरविण्याचा निर्णय घेतल्याने आता ग्राहकांचे पैसे वाचणार आहेत. तसेच त्यांना मोबाइलवरच वीजनिर्मिती, वीज वापर, अतिरिक्त युनिटची माहिती रोज मिळेल.

PM Surya Ghar Yojana महावितरणने सोलर नेट मीटर मोफत पुरविण्याचा निर्णय घेतल्याने आता ग्राहकांचे पैसे वाचणार आहेत. तसेच त्यांना मोबाइलवरच वीजनिर्मिती, वीज वापर, अतिरिक्त युनिटची माहिती रोज मिळेल.

शेअर :

Join us
Join usNext

महावितरणने सोलर नेट मीटर मोफत पुरविण्याचा निर्णय घेतल्याने आता ग्राहकांचे पैसे वाचणार आहेत. तसेच त्यांना मोबाइलवरच वीजनिर्मिती, वीज वापर, अतिरिक्त युनिटची माहिती रोज मिळेल.

PM Surya Ghar Yojana त्यानुसार त्यांना वीज वापराचे नियोजन करून वीजबिल शून्य आणण्यासाठीचे नियोजन करता येईल, असे महावितरणकडून सांगण्यात आले.

राज्यात सध्या ३ लाख २३ हजार ग्राहकांनी महावितरणकडे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. या सर्व ग्राहकांना सोलर नेट मीटर मोफत मिळणार आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत छतावर बसविलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पात किती वीज तयार झाली, ग्राहकाने घरात किती वीज वापरली, किती अतिरिक्त वीज ग्राहकाकडून महावितरणला विकली गेली? याची नोंद करण्यासाठी एक वेगळा नेट मीटर बसवावा लागतो.

आतापर्यंत त्याचा खर्च ग्राहकाला करावा लागत होता. आता छतावर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसवून मोफत वीज मिळविण्याच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महावितरणतर्फे ग्राहकांना मोफत नेट मीटर मिळणार आहे.

तीन किलोवॅटपर्यंतच्या क्षमतेचे प्रकल्प
▪️महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी. अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावे यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना आहे. त्या अंतर्गत तीन किलोवॅटपर्यंतच्या क्षमतेचे प्रकल्प बसविणाऱ्या ग्राहकांना केंद्राकडून अनुदान मिळते.
▪️प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना ३ फेब्रुवारीला सुरू झाली. तेव्हापासून ८३ हजार ७४ ग्राहकांनी सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसवले. त्यांची एकूण क्षमता ३१५ मेगावॅट आहे. त्यांना केंद्राकडून ६४७ कोटी अनुदान मंजूर झाले.

महावितरण काय करते?
महावितरण या योजनेची अंमलबजावणी करणारी राज्यातील नोडल एजन्सी आहे. महावितरणने यासाठी एक स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे.

'पेपरलेस' पद्धतीने काम
ग्राहकांना व पुरवठादारांना महावितरणच्या कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. नोंदणी केल्यापासून अंतिम मंजुरीनंतर प्रकल्प सुरु करेपर्यंत फेसलेस व पेपरलेस पद्धतीने काम चालते.

कुठे नोंदणी करायची?
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी www.pmsuryaghar.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी लागते.

Web Title: Mahavitaran will provide free solar net meters for solar energy generation; How to get the benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.