Marathwada Rain : मराठवाड्यातील ४ जिल्ह्यांतील ५७ मंडळांत गुरुवार सकाळपर्यंत मुसळधार पावसाने हजेरी लावली. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ५, जालना ३, हिंगोलीतील ९, तर नांदेड जिल्ह्यातील ४० मंडळात जोरदार पाऊस झाला. उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलका, रिमझिम व संततधार पाऊस सुरू होता.
दोन दिवसांपासून विभागात ढगाळ वातावरण असून, तुरळक सूर्यदर्शन होत आहे. सर्वाधिक पाऊस नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत झाला. विभागाच्या ६७९ मि.मी. वार्षिक सरासरीच्या तुलनेत ९६ मि.मी. पाऊस मराठवाड्यात आला आहे.
आजवरचा पाऊस (मि.मी.मध्ये)छत्रपती संभाजीनगर १२०, जालना ९९, बीड ५६, लातूर ७२, धाराशिव ९६, नांदेड १३६, परभणी ६८, हिंगोली ११७, एकूण ९६ मि.मी.
तरीही मराठवाड्यात ४२४ टँकरजून संपत आला तरीही २६८ गावांत ४२४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यात छत्रपती संभाजीनगरमधील १४८ गावे, २३ वाड्यांत २२८, तर जालना जिल्ह्यातील १०९ गावे, २३ वाड्यांमध्ये १८१ टँकर सुरू आहे. परभणी ८, हिंगोली २, तर नांदेडमध्ये ५ टँकर सुरू आहेत.
विभागातील प्रकल्पांत ३८ टक्के जलसाठामराठवाड्यात सध्या जायकवाडीसह ११ मोठ्या प्रकल्प व बंधाऱ्यांमध्ये ३८ टक्के जलसाठा आहे. जायकवाडीत यंदाच्या पावसाळ्यात ३९.७५ दलघमी पाणी आले आहे.