राज्याची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मजबूत आणि गतिशील अर्थव्यवस्थांपैकी एक असून चालू आर्थिक वर्षात ती ७.९ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज २०२५-२६ च्या आर्थिक पाहणी अहवालात मांडण्यात आला आहे.
कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील संतुलित वाढ, पायाभूत सुविधांमधील मोठी गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभतेसाठी केलेल्या सुधारणांमुळे राज्याची आर्थिक स्पर्धात्मकता अधिक बळकट झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात त्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. यासोबतच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीनुसार निर्णय घेण्यात येणार आहे.
शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता, त्याला कायमचा कर्जमुक्त करण्याचा संकल्प तसेच समितीच्या शिफारसींनुसार उपाययोजना सुरू केल्या जाणार आहेत.
विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा कर्जमाफीची घोषणा केली आहे.
३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार असून, या योजनेचे नामकरण 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' असे करण्यात आले आहे.
कर्जमाफीचा कुणाला कसा मिळणार फायदा?◼️ ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत होते, अशा पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.◼️ जे शेतकरी आपल्या कर्जाचे हप्ते वेळेवर आणि नियमितपणे भरत आहेत, अशा प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५०,००० रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.◼️ या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्जबाजारी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, शेती व्यवसायाला पुन्हा उभारी मिळण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
अधिक वाचा: मनाप्रमाणे जास्त क्षमतेचा सोलार प्रकल्प बसविण्याचा मार्ग झाला बंद; आता 'हा' नवा नियम लागू
Web Summary : Maharashtra's budget unveils a farmer loan waiver up to ₹2 lakh for overdue loans until September 2025. Regular repayers receive ₹50,000 incentives. The scheme, named after Ahilyadevi Holkar, aims to alleviate farmer debt and boost the agricultural sector. A committee will strengthen the banking system.
Web Summary : महाराष्ट्र के बजट में सितंबर 2025 तक बकाया ऋण वाले किसानों के लिए ₹2 लाख तक की ऋण माफी की घोषणा की गई है। नियमित रूप से ऋण चुकाने वालों को ₹50,000 का प्रोत्साहन मिलेगा। अहिल्यादेवी होल्कर योजना का उद्देश्य किसानों के ऋण को कम करना और कृषि क्षेत्र को बढ़ावा देना है।