Join us

E Pik Pahani : शेतात नेटवर्क नसले तरी पीक पाहणी करता येईल, हे सोपे उपाय करून पहा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 14:01 IST

E Pik Pahani : सर्व्हर डाऊन, नेटवर्क येत नाही. अनेक फोटो अपलोड होत नाहीत, अशा पद्धतीच्या तक्रारी शेतकरी वर्गाकडून येत आहेत.

E Pik Pahani :  ई पीक पाहणी दरम्यान अनेक अडचणी येत आहेत. यामध्ये सर्वात पहिली अडचण तर अँप चालत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सर्व्हर डाऊन, नेटवर्क येत नाही. अनेक फोटो अपलोड होत नाहीत, अशा पद्धतीच्या तक्रारी शेतकरी वर्गाकडून येत आहेत. जर तुम्हालाही अशा काही अडचणी येत असतील पुढील उपाय करून पीक पाहणी करता येईल. 

सर्व्हर डाऊनची अडचण असेल तर खरीप हंगाम 2025-26 च्या नोंदणीदरम्यान शेतात रजिस्ट्रेशन करत असताना सध्या सर्व्हरवर अधिक लोड येत आहे. तर . 

  • • रात्री चांगल्या नेटवर्क असलेल्या ठिकाणी (गावात/शहरात) रजिस्ट्रेशन पूर्ण करावे.
  • • सकाळी शेतात जाऊन ऑफलाईन पद्धतीने पीक पाहणी पूर्ण करावी.
  • • रात्री चांगल्या नेटवर्कमध्ये येऊन मोबाईल ॲपमधील “अपलोड” बटण वापरून डेटा सेव्ह करावा.

 

शेतात नेटवर्क नसले तरी पीक पाहणी करता येईलनोंदणी प्रक्रिया -ज्या ठिकाणी नेटवर्क उपलब्ध आहे, त्या ठिकाणी नाव नोंदणी (रजिस्ट्रेशन) पूर्ण करावी.(फक्त नोंदणी करिता नेटवर्कची आवश्यकता आहे)

पीक पाहणी -शेतामध्ये प्रत्यक्ष जाऊन ऑफलाईन पद्धतीने ई-पीक पाहणी (पड क्षेत्र, पिक माहिती, बांधावरची झाडे) माहिती पूर्ण भरावी. ऑफलाईन पीक पाहणी अपलोड करेपर्यंत आपल्या मोबाईल मध्ये साठवलेली राहील.

अपलोड प्रक्रिया -ज्या ठिकाणी नेटवर्क उपलब्ध आहे अशा ठिकाणी जाऊन होमपेजवरील "अपलोड" बटनवर क्लिक करून फोटो अपलोड करता येईल.(त्यानंतर 48 तासापर्यंत एकदाच पीक पाहणी दुरुस्त करता येईल व 96 तासांनी पीक पाहणी 7/12 वर दिसेल.)

मोबाईल ॲप अधिक सुरळीत चालण्यासाठी काय करावे? 

  • ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲपच्या आयकॉनवर काही सेकंद प्रेस करा.
  • App Info पर्यायावर क्लिक करा.
  • Storage या पर्यायावर क्लिक करा.
  • Clear Data यावर क्लिअर करा.
  • Clear Cache यावर क्लिअर करा.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीपीक व्यवस्थापन