Join us
Daily Top 2Weekly Top 5

Business Scheme : दूध व्यवसाय, किराणा दुकान, ब्युटी पार्लरसाठी 3 लाखांपर्यतचे कर्ज, अशी आहे योजना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 19:15 IST

Business Scheme : या योजनेद्वारे महिला ब्युटी पार्लर, टेलरिंग शॉप्स, किराणा दुकाने, दुग्धव्यवसाय असे स्वतःचे छोटे व्यवसाय सुरू करू शकतात.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने उद्योगिनी योजना २०२५ ला आणखी महिलाकेंद्रित केले आहे. या योजनेअंतर्गत, गरीब महिलांना कोणत्याही तारणाशिवाय ३ लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. यात ३० टक्के अनुदानदेखील दिले जात आहे. 

जर एखाद्या महिलेने ३ लाखांचे कर्ज घेतले तर तिला सरकारकडून मोठी आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेद्वारे महिला ब्युटी पार्लर, टेलरिंग शॉप्स, किराणा दुकाने, दुग्धव्यवसाय किंवा इतर लघु उद्योग असे स्वतःचे छोटे व्यवसाय सहजपणे सुरू करू शकतात.

महिलांसाठी 'उद्योगिनी योजना' ही महिलांना लघुउद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य देणारी योजना आहे, ज्यामध्ये अनेकदा ३ लाखांपर्यंत बिनतारण कर्ज आणि अनुदानाची तरतूद असते. 

या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांची उद्योजकता वाढवणे हा आहे. योजनेसाठी अर्ज करताना वय, उत्पन्न आणि व्यवसायाच्या स्वरूपानुसार पात्रता निकष पूर्ण करावे लागतात. 

कोणाला लाभ घेता येणार?महिलेचे वय १८ ते ५५ वर्षांच्या दरम्यान असावे आणि तिने मागील कोणतेही कर्ज थकवलेले नसावे. तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दीड लाख पेक्षा कमी असले पाहिजे. अपंग आणि विधवांसाठी उत्पन्न मर्यादा नाही. या योजनेअंतर्गत ८८ प्रकारचे व्यवसाय सुरु करता येतात. 

अर्ज कसा करावा : तुम्ही UMANG, myScheme किंवा संबंधित सरकारी वेबसाइटवर या योजनेची माहिती घेऊ शकता.आवश्यक कागदपत्रांची यादी आणि इतर तपशिलांसाठी संबंधित बँक किंवा सरकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. 

English
हिंदी सारांश
Web Title : Udyogini Yojana: Loans up to ₹3 Lakh for Women Entrepreneurs

Web Summary : The Udyogini Yojana 2025 empowers women with collateral-free loans up to ₹3 lakh, including subsidies. It supports ventures like beauty parlors, tailoring, and grocery stores, fostering financial independence. Eligibility requires women aged 18-55 with family income below ₹1.5 lakh. Apply via UMANG or government websites.
टॅग्स :कृषी योजनाव्यवसायशेती क्षेत्रशेतकरी