Women's Day : 'जेमतेम शेतीत राबून उत्पन्न घेणं एवढंच काय ते काम. पण इतर दिवस घरी बसूनच काढावे लागतात. महिलांसाठी काहीतरी छोटे मोठे व्यवसाय, उद्योग उभारणे गरजेचे आहे. जेणेकरून महिलांच्या हाताला काम मिळेल, फावला वेळ अशा कामात गुंतवून कुटुंबाला हातभार लागेल आणि प्रत्येक महिला जेव्हा अशा गोष्टीतून सक्षम होईल, तेव्हा खरा महिला दिन असेल', अशी खंत ग्रामीण भागातील महिलांनी बोलून दाखवली.
आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लोकमत ऍग्रोच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यातील महिला शेतकऱ्यांची संवाद साधला. यावेळी पारंपरिक भात शेतीसह आंबा लागवड, मोहफुलाचे अर्थकारण, शेती व्यतिरिक्त रोजगाराचे साधन आणि महिला शेतकऱ्यांच्या अपेक्षा यावर चर्चा झाली. यावेळी उपस्थित सहभागी महिलांनी अतिशय सुंदररित्या विषय विमोचन करत आजच्या घडीला ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांचे वास्तव मांडले.
मिलेट्स कडे दुर्लक्ष
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर भातशेतीसह पारंपारिक पिकांमधील नागली, वरई पिके घेतली जातात. मात्र अलीकडच्या काळात या पिकांच्या लागवडीसह उत्पादनात मोठी घट होत असल्याचा जिथून येत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना महिला म्हणाल्या की, वातावरणात झालेला बदल आणि पारंपारिक पिकांमधून मिळत असलेले उत्पन्न, यामुळे इथला शेतकरी इतर नोकरी व्यवसायात येऊ लागला आहे परिणामी पारंपारिक पिकांच्या उत्पादनात घट येऊ लागली आहे. एकीकडे शासन मिलेटच्या नावावर घोषणा करत असताना दुसरीकडे मात्र मिलेट्समधील पिके मात्र दुर्लक्षित होत असल्याचे पाहायला मिळते आहे.
आंबा लागवडीकडे कल
दुसऱ्या बाजूला या परिसरातील शेतकरी आंबा लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहे. गेल्या काही वर्षात या परिसरातील आंबा लागवड वाढली. असल्याचे चित्र आहे मात्र मागील काही वर्षात फेब्रुवारी, मार्च एप्रिल या महिन्यात होत असलेल्या गारपिटीमुळे आंबा बागांवर देखील परिणाम होत असल्याचं या महिलांकडून सांगण्यात आलं. शिवाय फेब्रुवारीपासूनच या परिसरात पाणीटंचाई निर्माण होते. त्यामुळे आंबा बागांना पाणी देण्यासाठी मोठी मेहनत घ्यावा लागत असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितले.
मोह फुलाचे अर्थकारण
तसेच या परिसरात मोह फुलाचे अर्थकारण वाढत चालले आहे. कारण आदिवासी पट्ट्यात मोह फुलांची झाडे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात आणि याच मोह फुलांपासून आज मी त्याला अनेक शेतकरी महिला या विविध पदार्थ बनून विक्री करत आहेत. एकीकडे भात पीक हे केवळ चार ते पाच महिन्यांचा पीक असताना इतर महिन्यांमध्ये रोजगाराचा कुठलेही साधन उपलब्ध नसल्याचे या महिलांनी सांगितलं. त्यामुळे मऊ फुलापासून विविध पदार्थ बनवून छोटासा उद्योग या माध्यमातून सुरू करता येईल, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे या महिलांनी सांगितले.
महिला दिन म्हणजे काय, हे आम्हाला माहितच नाही, किंवा महिला दिन का साजरा केला जातो, हे देखील माहिती नाही. शिवाय आमच्या गावातही कधी महिला दिन साजरा केल्याचे आठवत नाही, असा सूर ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्याच्या तोंडून ऐकायला मिळाला.