Join us

जलसंधारणाच्या माध्यमातून हिरवाईचे स्वप्न वक्टे यांनी साकारले वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 17:11 IST

पाळोदी येथील डिगांबर वक्टे हे एक प्रगतशील शेतकरी. पारंपरिक शेतीतून मिळणाऱ्या अपुर्‍या उत्पन्नामुळे ते हताश झाले होते. मात्र, त्यांनी या परिस्थितीवर मात करत शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग करत पालेभाज्यांची यशस्वी लागवड करत अल्प पावसाच्या प्रदेशातही हरित क्रांती घडवली. (water conservation)

पाळोदी येथील डिगांबर वक्टे हे एक प्रगतशील शेतकरी. पारंपरिक शेतीतून मिळणाऱ्या अपुर्‍या उत्पन्नामुळे ते हताश झाले होते. मात्र त्यांनी या परिस्थितीवर मात करत शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग करत पालेभाज्यांची यशस्वी लागवड करत अल्प पावसाच्या प्रदेशातही हरित क्रांती घडवली.  (water conservation)

प्रगतशील शेतकरी डिगांबर वक्टे यांनी जानेवारी महिन्यात आपल्या शेतात वांगी, गवार, भेंडी पालेभाज्यांची तसेच जनावरांसाठी चाऱ्याची लागवड केली होती. सुरुवातीला पाणीपुरवठ्याची चिंता असली तरी, जलसंधारणाच्या उपाययोजनांमुळे या भाजीपाला पिकांचे उत्पादन यशस्वी ठरले आहे.  (water conservation)

पाणीटंचाईतून यशाकडे वाटचाल

जानेवारी महिन्यात वांगी, गवार, भेंडीसह पालेभाज्या आणि जनावरांसाठी चाऱ्याची लागवड त्यांनी आपल्या शेतात केली. पण पाण्याची टंचाई ही मोठी अडचण होती.

शेताच्या गरजांसाठी उपलब्ध असलेले पाणी अपुरे पडत होते. मात्र वक्टे यांनी हार न मानता शेततळ्याच्या माध्यमातून पाणीसाठवणूक केली. शेततळ्याला सौरऊर्जा संच जोडला आणि सिंचनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध केले.  (water conservation)

आत्मनिर्भर शेती

सौरऊर्जेचा वापर करून मोटारी चालवल्या जातात, यामुळे विजेवरील अवलंबित्व कमी होते. कुटुंबातील सदस्यांच्या नावाने सिंचन विहिरींची उभारणी केली आणि गरजेनुसार पिकांना पाणी देऊन पिके वाचवली. मार्च महिन्यात विहिरींमध्ये पाणी कमी होण्यास सुरुवात झाली, आणि उत्पादनावर संकट निर्माण झाले.  (water conservation)

मात्र, एप्रिलमध्ये जलयुक्त शिवार योजनेतून चोंडा नाल्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले. यामुळे भूगर्भातील जलपातळी वाढली आणि विहिरींमध्ये पुन्हा पाणी दिसू लागले.  (water conservation)

पालेभाज्यांचा भरगच्च नफा

आज वांगी, गवार आणि भेंडीसह पालेभाज्या आणि चाऱ्याचीही उत्पादन क्षमता वाढली आहे. पालेभाज्यांची नियमित काढणी होत असून बाजारात विक्री करून वक्टे कुटुंबाला चांगले उत्पन्न मिळत आहे.

अन्य शेतकऱ्यांसाठी प्रेरणा

वक्टे हे अल्पभूधारक असूनही त्यांनी नवकल्पना, तंत्रज्ञान आणि सरकारी योजना यांचा उपयोग करत शेती यशस्वी केली. शाश्वत सिंचन, सौरऊर्जा आणि जलसंधारणाच्या त्रिसूत्रीवर त्यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला.

जलयुक्त शिवार योजनेमुळे आमचे शेतीचे गणितच बदलले. आता आम्ही नुसते तग धरलेले नाही, तर भरघोस उत्पन्न घेत आहोत. या योजनेमुळे पाणी टंचाईचे संकट दूर झाले. - डिगांबर वक्टे, शेतकरी

हे ही वाचा सविस्तर : Chia Seeds: चिया बियांचे असे आहेत चमत्कारी फायदे वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीलागवड, मशागत