Lokmat Agro >शेतशिवार > Ustod Kamgar Mahila : महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार महिलांना गर्भपिशवी का काढावी लागतेय? 

Ustod Kamgar Mahila : महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार महिलांना गर्भपिशवी का काढावी लागतेय? 

Latest News Ustod Kagmar Mahila sugarcane women workers in Maharashtra have their wombs removed | Ustod Kamgar Mahila : महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार महिलांना गर्भपिशवी का काढावी लागतेय? 

Ustod Kamgar Mahila : महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार महिलांना गर्भपिशवी का काढावी लागतेय? 

Agriculture News : गेल्या काही वर्षात ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्याचा (Women health) प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Agriculture News : गेल्या काही वर्षात ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्याचा (Women health) प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

बीड : महाराष्ट्रात (Maharashtra) ऊसतोड कामगारांची संख्या बहुतांश आहे. पुरुषांच्या संख्येनेच महिला कामगारांची संख्या पाहायला मिळते. गेल्या काही वर्षात ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्याचा (Women health) प्रश्न ऐरणीवर आला आहे. यातील अनेक महिलांना ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढावी लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

बीड ऊसतोड कामगारांचा (Beed District) जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यामधून प्रत्येकवर्षी १ लाख ७५ हजार मजूर ऊसतोडीच्या कामाला जातात. यापैकी ७८ हजार महिला मजूर आहेत. त्यातील ८४३ महिलांनी ऊसतोडीला (sugarcane Cutting) जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

यात ३० ते ३५ वयोगटातील महिलांचा अधिक समावेश आहे. तसेच, १,५२३ महिला गर्भवती असतानाही उसाच्या फडात काम करत असल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्यातील ऊसतोड मजूर हे दिवाळीच्या दरम्यान महाराष्ट्रासह परराज्यात कामासाठी जातात. 

सहा महिने ऊसतोडणी करून ते डिसेंबर, जानेवारी महिन्यात परत येतात. आरोग्य विभागाकडून ऊसतोडीला जाण्यापूर्वी आणि आल्यावर त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. त्याप्रमाणे आता याचा अहवाल तयार झाला आहे. यात महिलांना विविध आजार असल्याचे समोर आले आहे. 

३० ते ३५ वयोगटामधील ४७७ महिलांची काढली गर्भपिशवी 
ऊसतोडीला जाण्यापूर्वी जिल्ह्यातील ८४३ महिलांची गर्भपिशवी काढण्यात आली. त्यातही ३० ते ३५ वयोगटातील ४७७ महिलांची शस्त्रक्रिया झाली आहे. अंगावरून जाणे, मासिक पाळीत रक्तस्राव होणे, जंतुसंसर्ग, पोटात दुखणे अशी लक्षणे या महिलांना असल्याचे सांगण्यात आले.

पोटात बाळ अन् दुसरीकडे पोटासाठी हाती कोयता
जिल्ह्यातील १,५२३ महिलांनी गर्भवती असतानाही उसाच्या फडात काम केले. पोटात बाळ आणि पोटासाठी हाती कोयता, असा संघर्ष त्यांचा होता. या सर्व महिलांची नोंद माता व बाल संगोपन पोर्टलवर झाली आहे.

ऊसतोडीला जाण्यापूर्वी आणि आल्यावर महिलांची आरोग्य तपासणी केली जाते. ८४३ महिला कामगारांची गर्भपिशवी शस्त्रक्रिया आणि १,५२३ महिला गर्भवती आहेत, हे खरे आहे.
- डॉ. सचिन शेकडे, माता व बालसंगोपन अधिकारी, बीड

Web Title: Latest News Ustod Kagmar Mahila sugarcane women workers in Maharashtra have their wombs removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.