Krushi Avjare Bank : नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा-२ हा महाराष्ट्र शासनाचा जागतिक बँकेच्या सहाय्याने राबविण्यात येत असून यवतमाळ जिल्ह्यातील ५५९ गावे यात समाविष्ट आहेत.
या पार्श्वभूमीवर कृषि यांत्रिकीकरणाला चालना देणे आवश्यक असून, सर्व शेतकऱ्यांना यंत्रसामग्री खरेदी करणे शक्य नसल्याने गावस्तरावर नोंदणीकृत महिला बचत गट यांचे मार्फत "गावस्तरावरील कृषि अवजारे बँक" स्थापन करून अनुदानित यंत्रसामग्री भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत व अचूक शेतीकाम करून उत्पादकता व नफा वाढविता येईल.
त्याकरिता प्रकल्प गावांमध्ये "एक गाव एक कृषी अवजारे बँक" या तत्त्वानुसार कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी ५ एप्रिल २०२६ अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश शेतीकामासाठी लागणारी यंत्रसामग्री भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचे श्रम आणि खर्च कमी करणे हा आहे.
सदर घटकाकरिता प्रकल्प गावातील उमेद (MSRLM) व माविम (MAVIM) पुरस्कृत महिला बचत गट तसेच महिला गाव संघ या योजनेसाठी पात्र राहतील. अर्ज करण्यासाठी इच्छुक महिला गटांनी FPO-DBT पोर्टलच्या https://dbtndksp.mahapocra.gov.in/ या संकेतस्थळावर ५ एप्रिल २०२६ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
एका गावातून एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास, जिल्हा स्तरावर ऑनलाईन लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाईल. अर्जदार महिला बचत गटांमध्ये वेगवेगळ्या कुटुंबातील किमान १० महिला सदस्य असणे आवश्यक आहे. कृषि अवजारे बँकांसाठी प्रकल्प मूल्याच्या ६० टक्के अनुदान देय राहील आणि अनुदानाची कमाल मर्यादा रक्कम २४ लाख रुपये इतकी राहील.
ज्या गटांना यापूर्वी कोणत्याही योजनेतून कृषी अवजारे बँकेसाठी लाभ देण्यात आला आहे असे गट या घटकांतर्गत लाभास पात्र राहणार नाहीत. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभाग कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ यांनी केले आहे.
सोलार पॅनलपासून शॉक लागून खरंच मृत्यू होतो का, सिस्टीम चालू असताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Web Summary : Yavatmal's women's groups can establish agri tool banks with 60% subsidy (max ₹24L). Apply by April 5, 2026, via the FPO-DBT portal. Aim: Reduce farmers' costs, increase productivity. One bank per village, lottery selection if multiple applications.
Web Summary : यवतमाल में महिला समूह 60% सब्सिडी (अधिकतम ₹24 लाख) के साथ कृषि उपकरण बैंक स्थापित कर सकते हैं। एफपीओ-डीबीटी पोर्टल के माध्यम से 5 अप्रैल, 2026 तक आवेदन करें। उद्देश्य: किसानों की लागत कम करना, उत्पादकता बढ़ाना। प्रति गांव एक बैंक, अनेक आवेदन होने पर लॉटरी द्वारा चयन।