Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्यात प्लॅस्टिक अस्तर बसविण्यासाठी आकारमाननिहाय किती अनुदान मिळते, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 14:50 IST

Agriculture News : ही योजना प्रामुख्याने एकात्मिक फलोत्पादन अभियान आणि मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून राबवली जाते

Agriculture News : महाराष्ट्र शासनाच्या वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेततळ्यात पाणी साठवण्यासाठी प्लॅस्टिक अस्तर (lining) बसवण्यासाठी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. 

ही योजना प्रामुख्याने एकात्मिक फलोत्पादन अभियान आणि मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून राबवली जाते, ज्यासाठी ५०० मायक्रॉनची प्लॅस्टिक फिल्म वापरणे अनिवार्य आहे. तर शेततळ्याचे आकारमान व ५० टक्क्याप्रमाणे अनुदान किती मिळते, ते पाहुयात... 

पात्रता काय लागते? अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी व शेतकरी असावा. स्वतःच्या शेतात खोदलेले शेततळे असावे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, मग्रारोहयो (MGNREGS) मधून लाभ घेतलेले शेतकरी देखील पात्र.

आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड, ७/१२ उतारा, बँक पासबुक, शेततळ्याचा फोटो व अर्ज. अस्तरीकरणाचा निकष : ५०० मायक्रॉन (Micron) जाडीचा प्लॅस्टिक फिल्म (HDPE/LDPE) वापरणे आवश्यक. 

शेततळ्याचे आकारमान व ५० टक्क्यांप्रमाणे मिळणारे अनुदान

  • ▶ १५०१५ x ३ मीटर - २८ हजार ५७५ रुपये 
  • ▶ २०×१५० ३ मीटर - ३७ हजार ९९१ रुपये 
  • ▶ २० × २० × ३ मीटर - ४२ हजार २१२ रुपये 
  • ▶ २५ x २० × ३ मीटर - ४९ हजार ६१७ रुपये 
  • ▶ २५ x २५ x ३ मीटर - ६८ हजार रुपये 
  • ▶ ३० × २५ x ३ मीटर - ६७ हजार ७८२ रुपये 
  • ▶ ३० × ३० × ३ मीटर - ७५ हजार रुपये 

अशा पद्धतीने अनुदान मिळते. यासाठी mahadbt पोर्टलवर जाऊन रीतसर अर्ज करावा लागतो. 

 

 ऑनलाईन लाईट बिल भरा, वीजबिलावर अतिरिक्त सवलत मिळवा, महावितरणकडून खास ऑफर

 

English
हिंदी सारांश
Web Title : Subsidy for Farm Pond Plastic Lining: Size-wise Details

Web Summary : Maharashtra offers up to 50% subsidy for plastic lining of farm ponds under integrated horticulture and sustainable agriculture schemes. Farmers need valid documents and must use 500-micron plastic film. Subsidy varies based on pond size; apply on the MahaDBT portal.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीपाणीकृषी योजना