Join us

Unhali Bhat Pik : उन्हाळी भात पीक गर्भावस्थेत, पाण्याची कमी, पाणी विकत घेण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 13:40 IST

Unhali Bhat Pik : उन्हाळी धान सध्या गर्भावस्थेत असून त्याच्या पोषणासाठी मुबलक पाण्याची गरज (Water Crop Management) आहे. मात्र,

- मंगेश सेलोकर भंडारा : उन्हाळी धान सध्या गर्भावस्थेत असून त्याच्या पोषणासाठी मुबलक पाण्याची गरज (Water Crop Management) आहे. मात्र, वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचे धान पीक धोक्यात आले आहे. सध्या शेतकऱ्याच्या शेतात रब्बी पीक म्हणून उन्हाळी धनाची फसल डौलत आहे. पण, अपुऱ्या पाण्यामुळे शेतकऱ्यांची (Unhali Bhat Pik) चिंता वाढली आहे. पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत असलेल्या बोअरवेलवर संपूर्णपणे विजेवर अवलंबून असलेला सिंचन व्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने बोअरवेल खणून सिंचनासाठी (Boar Well Water) व्यवस्था केली आहे. मात्र, वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने या पिकांना वेळेवर पाणी देणे अशक्य झाले आहे. विद्युत विभागाकडून दिवसातून आठ तास वीज दिली जात असल्याचा दावा केला जातो, परंतु प्रत्यक्षात वीज अपुऱ्या दाबाने किंवा वारंवार खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.

विद्युत विभागाने अखंडित वीज पुरवठा (Power Supply Down) करण्याची मागणी शेतकरी वर्ग नेहमीच करीत असतात. ग्रामीण क्षेत्रात कोणतेही उद्योग नाहीत, त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील शेतकऱ्यांची शेती हा एकमेव उद्योग आहे. रोजगाराची कमतरतेने शिक्षित युतक सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतीकडे वळला आहे. शेतीला बारमाही ओलीत होणार, अशी कोणतीही जलसिंचनाची सोय परिसरामध्ये उपलब्ध नाही. 

त्यामुळे शेती करणे आजच्या घडीला कठीण झाले आहे. या अवस्थेत धानाला पाणी न मिळाल्यास धान पोचट होऊन धान उत्पादन कमी होण्याची भीती असते. उन्हाळी धानाला नहाराच्या पाण्याची तेवढी सोय नसते. शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर विद्युत विभागाने याची दखल घेत बारा तासांऐवजी दहा तास वीजपुरवठा देण्यात सुरुवात केली आहे.

पाणी विकत घेण्याची वेळरब्बी हंगामातील पिके घेण्यासाठी शेतकरी स्वतच्या पाण्याची सोय करून पीके घेतात. खरीप हंगामातील पिकांसाठी वेळेवर पाणी मिळणे गरजेचे असते. सध्या मोठ्या प्रमाणात शेतात उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. उन्हाळ्यात शक्यतो नहराची पाणी मिळत नाही. पण, अशा उन्हाळ्यात बोअरवेलचे पाणी कमी-जात असल्याने शेतकऱ्यांना दुसऱ्या शेतकऱ्यांकडून पाणी विकत घ्यावे लागत आहे. अशातच वेळेवर वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

शेतकऱ्यांना आंदोलनाची का गरज?धानाच्या पिकासाठी शेवटच्या पाण्याची खूप अत्यंत गरज आहे. वीजपुरवठा आठ तास तोही सुरळीत नाही. अशातच बारा तास वीजपुरवठा करावा, म्हणून शेतकऱ्यांनी विद्युत विभागाला अर्ज दिले, पण अर्जाची दखल घेतली जात नसल्याने शेतकरी राजा शेतातील सर्व कामे सोडून आंदोलनाच्या मागे पडले आहेत. जगाच्या पोशिंदालाच आंदोलन करावे लागत असेल तर ही एक शोकांतिका आहे.

जीवाचे रान करून आम्हाला शेती करावी लागते. पिकांवर पडणारे रोग बघता संरक्षणासाठी औषधांचा खर्च होतो. आम्हाला नफाही उरत नाही, असे चित्र आहे. उन्हाळी धानाच्या शेतीला अपुऱ्या पाण्यामुळे भेगा पडल्या आहेत. गर्भातील असलेला धान खराब होण्याची भीती आहे. कोणतीही अट न ठेवता शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करावा.- उमराव बडवाईक, शेतकरी कांद्री .

टॅग्स :भातपीक व्यवस्थापनशेती क्षेत्रशेती