Agriculture News : दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात अतिशय दुर्दैवी घटना घडली. विहिरीचे काम सुरु असताना अचानक मलबा कोसळल्याने वडिलांसह दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर शेती कामात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झाल्यास किती मोठा अनर्थ घडू शकतो, याची जाणीव झाली.
सिंचन सुविधेसाठी अनेक शेतकरी योजनेतून किंवा स्वखर्चाने विहीर खोदण्याचे काम करतात. विहिरीला पाणी लागल्यानंतर सिंचनाची चांगली सुविधा मिळते. हाच हेतू डोळ्यासमोर ठेऊन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील धानोरा येथील काकडे कुटुंबातील वडील बाजीराव सर्जेराव काकडे (५५ वर्ष) आणि त्यांची दोन मुले—आजिनाथ (२५ वर्ष) व श्याम (२२ वर्ष) हे दोघे रात्री साडे नऊच्या सुमारास विहिरीवर गेले.
नेमकं काय घडलं?
काकडे यांच्या शेतात नवीन विहिरीचे काम सुरू होते. विहरीवर बांधलेल्या कठड्यावर पाणी मारायचे होते. यासाठी हे तिघेही इलेक्ट्रिक मोटार लावत होते. मात्र इलेक्ट्रिक मोटर सुरु न झाल्याने ते विहिरीत उतरले. याचवेळी कठडयासंह विहीर ढासळली. यावेळी ढिगाऱ्याखाली दबले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अशावेळी सुरक्षा टिप्स वापरा
अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी विहिरीचे काम करताना किंवा काठावर उभे राहून काम करताना काही महत्त्वाच्या सुरक्षा टिप्स पाळणे गरजेचे आहे -
विहिरीच्या काठापासून सुरक्षित अंतर : नवीन विहीर खोदताना काढलेली माती कधीही विहिरीच्या अगदी काठावर साठवून ठेवू नये. मातीचा भार वाढल्याने काठ खचण्याची दाट शक्यता असते.
पावसाळी वातावरण आणि ओलसर माती : माती भूसभुशीत किंवा ओलसर असल्यास ती कधीही ढासळू शकते, अशा वेळी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
पुरेशी प्रकाश व्यवस्था : रात्रीच्या वेळी विहिरीजवळ काम करताना प्रखर प्रकाशाची व्यवस्था असावी, जेणेकरून काठाला पडलेले तडे किंवा माती सरकताना लक्षात येईल.
संरक्षक कठडा : शक्य असल्यास कामाच्या ठिकाणी तात्पुरता का होईना, भक्कम आधार किंवा कठडा तयार करावा.
Gas Cylinder KYC : केवायसी केली तरीही तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही, केंद्र सरकारचे नवे नियम पहा!
Web Summary : A well collapse in Chhatrapati Sambhajinagar killed a farmer and his two sons. The incident highlights the dangers of neglecting safety during farm work. Safety tips include maintaining distance from the well's edge, especially with loose soil, and ensuring adequate lighting for night work.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर में कुआँ ढहने से एक किसान और उसके दो बेटों की मौत हो गई। यह घटना कृषि कार्य के दौरान सुरक्षा की अनदेखी के खतरों को उजागर करती है। सुरक्षा उपायों में कुएं के किनारे से दूरी बनाए रखना, खासकर ढीली मिट्टी होने पर, और रात में काम के लिए पर्याप्त रोशनी सुनिश्चित करना शामिल है।