Join us

Tobacco Farming : महिलांना रोजगार, शेतकऱ्यांना नफा; तंबाखू लागवडीचा संघर्षमय प्रवास वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 11:29 IST

Tobacco Farming : महाराष्ट्र-तेलंगणा सीमाभाग व परिसरात तंबाखूची मोठ्या प्रमाणात लागवड (Cultivation) केली जाते. या पिकापासून भरघोस उत्पन्न मिळते पण या शेतीमागे आहे धूर, जोखीम अन् अतोनात मेहनत. वाचा तंबाखू लागवडीचा संघर्षमय प्रवास. (Tobacco Farming)

लक्ष्मण तुरेराव

धर्माबाद व बिलोली तालुक्यातील महाराष्ट्र-तेलंगणा सीमाभागात तंबाखूची मोठ्या प्रमाणात लागवड (Cultivation) केली जाते. एका एकरातून मिळतंय लाखोंचं उत्पन्न, पण या शेतीमागे आहे धूर, जोखीम अन् अतोनात मेहनत. (Tobacco Farming)

शेतकरी महिलांपासून मजुरांपर्यंत सगळ्यांनाच दिवस-रात्र झिजावे लागते. धुरामुळे आरोग्याला धोका आणि कामात थोडीशी चूक झाली, तर जीवावर बेतू शकते. तरीही तंबाखू शेती सुरूच आहे.(Tobacco Farming)

अशी केली जाते तंबाखूची लागवड 

बागायती शेतकरी तंबाखूची लागवड  (Cultivation) मोठ्या प्रमाणात करतात. २ बाय ३ अंतरावर तंबाखूची रोपे लावली जातात. पिकाला आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाणी दिले जाते. हे पीक तीन महिन्यात हाती येते. रोपे मोठी झाल्यानंतर पाने तोडली जातात. 

तोडलेली पाने एका दोरीत ओवली जातात. पाने तोडण्यासाठी महिलांना मजुरी मिळते. शंभर पाने ओवली तर सतरा ते वीस रुपये महिलांना मिळतात. एका दिवसात चारशे ते पाचशे रुपये मजुरी महिलांना मिळते. 

धर्माबाद व बिलोली तालुक्यातील सीमाभागात तंबाखूचा गड

धर्माबाद तालुक्यातील बेल्लुर, आल्लुर, बामणी संगम, मनूर, सिरसखोड, चिंचोली, जाफलापूर, तसेच बिलोली तालुक्यातील डौर, आरळी, पिंपळगाव, माचनूर आदी गावांत तंबाखू शेती जोमात सुरू आहे. बागायती शेतकरी २ बाय ३ फूट अंतरावर तंबाखू रोपे लावतात. हे पीक केवळ तीन महिन्यात हाती येते.

महिलांसाठी रोजगाराची संधी

तंबाखूच्या पानांची तोडणी व ओवणी महिलांकडून केली जाते. शंभर पाने ओवल्यास त्यांना १७ ते २० रुपये मजुरी मिळते. एका दिवसात महिलांना ४०० ते ५०० रुपये कमाई होते.

धुराचा टप्पा : धोकादायक पण गरजेचा

* पाने तोडल्यावर ती दोरीला ओवून, विशेष प्रकारच्या खड्ड्यांमध्ये धूर दिला जातो.

* १८x४२ फूट रोड आणि ७x४ फूटचे खड्डे तयार होतात.

* त्यात बेशरम, सोयाबीन काड, भूस टाकून २५ दिवस रात्रंदिवस धूर दिला जातो.

* या प्रक्रियेत शेतकरी व मजुरांना सतर्क राहावे लागते, कारण धुरामुळे गुदमरून मृत्यूचीही शक्यता असते. चिकना (धर्माबाद) येथे अशी एक दुर्घटना घडली होती.

कंपनीकडे विक्री खर्च व नफा

* पाने कडक लालसर झाल्यावर ती काढून विक्रीसाठी पाठवली जातात.

* प्रत्येक एकरातून १० क्विंटल उत्पादन मिळते. 

* सध्या दर ११ हजार ते १३ हजार ५०० प्रतिक्विंटल आहे.

* एकरी खर्च ५० हजारापर्यंत जातो पण उत्पन्न सुमारे १ लाख रुपयांपर्यंत मिळते.

* दहा ते पंधरा एकर लागवड करणारे शेतकरी ही शेती मोठ्या प्रमाणावर करतात.

हे ही वाचा सविस्तर : Bamboo Sheti : कमी जागेत, मोठा नफा; बांबू पिकाने दिला नवा मार्ग वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीनांदेडमहाराष्ट्रतेलंगणा