Join us
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याने डोळ्यात पाणी; कवडीमोल भावामुळे साठवणुकीवर भर, आज काय दर मिळाले? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 17:35 IST

Agriculture News : या 'लाल सौन्याला' बाजारात अत्यंत अल्प भाव मिळत असल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे.

Agriculture News :    सध्या उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम जोमाने सुरू आहे. मात्र, रक्ताचे पाणी करून पिकवलेल्या या 'लाल सौन्याला' बाजारात अत्यंत अल्प भाव मिळत असल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे.

शेतकऱ्यांच्या मते, एक एकर कांदा पिकवण्यासाठी साधारण २० ते २५ हजार रुपये खर्च येतो. यात बियाणे, खते, मशागत आणि मजुरीचा समावेश आहे. मात्र, सध्या बाजारात केवळ ११०० ते १२ते रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. या दरात साधी मजुरी आणि वाहतुकीचा खर्च निघणेही कठीण झाले आहे. 

मजुरीच्या दरात वाढ, उत्पादनात घट
कांदा काढणीसाठी मजुरांना प्रति एकर ७ ते ८ हजार रुपये द्यावे लागत आहेत. मजुरीचे दर गगनाला भिडले असताना कांद्याचे दर मात्र कोसळले आहेत. यावर्षी कांदा पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर घट येत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. सुरुवातीला पावसाने बियाणे खराब केल्याने अनेकांना दुबार पेरणीचा आर्थिक फटकाही सहन करावा लागला आहे.

'चाळीत' कांदा साठवण्याकडे कल
बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने म्हसदीसह धमणार, वसमार, दातीं, चिचखेडे, काळगाव, राजबाई शेवाळी, ककानी, भडगाव, अक्कलपाडा, सैय्यदनगर, तामसवाडी या परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपला माल विकण्याऐवजी तो 'चाळीत' साठवण्यावर भर दिला आहे. भविष्यात कथीतरी चांगले भाव मिळतील, या आशेवर शेतकरी पुन्हा एकदा नशिबाचा जुगार खेळत आहे.

वाचा आज काय भाव मिळाला? 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

13/04/2026
कोल्हापूर---क्विंटल710250014001000
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल520120014001300
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल120306001200900
विटा---क्विंटल4080012001000
सातारा---क्विंटल132100014001200
कराडहालवाक्विंटल24950012001200
सोलापूरलालक्विंटल410511001520600
येवलालालक्विंटल1800150950700
धुळेलालक्विंटल763001020800
जळगावलालक्विंटल2243121002687
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1500300928678
नागपूरलालक्विंटल2480100012001150
चांदवडलालक्विंटल1020300990730
मनमाडलालक्विंटल500300950500
यावललालक्विंटल130096012001100
देवळालालक्विंटल840250845750
हिंगणालालक्विंटल7110016001433
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल28564001400900
पुणेलोकलक्विंटल112174001300900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1370014001050
पुणे-मोशीलोकलक्विंटल7125001200850
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल13100300850300
वडूजलोकलक्विंटल8070014001000
मंगळवेढालोकलक्विंटल21820012001000
कामठीलोकलक्विंटल7152020201770
बारामती-जळोचीनं. १क्विंटल4523001121800
शेवगावनं. १क्विंटल5248001000900
शेवगावनं. २क्विंटल430400700600
शेवगावनं. ३क्विंटल376100300250
नागपूरपांढराक्विंटल2000100012001150
येवलाउन्हाळीक्विंटल72002001238900
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल450050015511150
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल185003001200663
सिन्नरउन्हाळीक्विंटल259530012561000
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल10605001188925
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल7521001300900
कळवणउन्हाळीक्विंटल625070015051100
चांदवडउन्हाळीक्विंटल120205001545910
मनमाडउन्हाळीक्विंटल6005001250950
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2530040018251400
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल275155011911015
साक्रीउन्हाळीक्विंटल20004001105900
दिंडोरीउन्हाळीक्विंटल76991116371401
देवळाउन्हाळीक्विंटल470040014251100
नामपूरउन्हाळीक्विंटल260520012751000

 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Onion prices crash, farmers store produce hoping for better rates.

Web Summary : Farmers face losses as onion prices plummet despite high production costs. Many are storing their produce, hoping prices will rise. Current rates range from ₹100 to ₹2020 per quintal across markets.
टॅग्स :शेती क्षेत्रकांदाशेतीपीक व्यवस्थापन