Sugarcane Farmers Protest : ऊसदरवाढीसाठी मराठवाड्यात आंदोलनाचा ज्वाला पुन्हा भडकली आहे. माजलगावातून सुरू झालेल्या 'कोयता बंद' आंदोलनाने शेतकरी आक्रमक झाले असून, ऊस उत्पादकांनी ट्रॅक्टरची हवा सोडून अनोखा निषेध नोंदवला.(Sugarcane Farmers Protest)
३ दिवसांत सरकारने दरवाढीवर तोडगा काढला नाही तर उस कारखाने बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील पहिले ऊस गाळपबंद आंदोलन म्हणून या कृतीकडे राज्यभरातून लक्ष लागले आहे.(Sugarcane Farmers Protest)
ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रकची हवा सोडली जात असून, ऊसतोड मजुरांनीही 'कोयता बंद' जाहीर करून आंदोलनाची धार अधिक तीव्र केली आहे. (Sugarcane Farmers Protest)
येत्या तीन दिवसांत मागण्यांवर निर्णय झाला नाही तर कारखाने बंद पाडू, असा इशारा समितीने दिला आहे. माजलगावातून सुरू झालेले हे आंदोलन आता परभणीसह संपूर्ण मराठवाड्यात पसरत आहे.(Sugarcane Farmers Protest)
आंदोलन का पेटले?
युवा शेतकरी संघर्ष समितीने ३१ ऑक्टोबरपासून ऊसदरवाढीसाठी आंदोलन सुरू केले आहे.
शेतकऱ्यांची मुख्य मागणी :
पहिली उचल – ३,००० रु. प्रतिटन
अंतिम बिल – ४,००० रु. प्रतिटन
सध्या कारखाने फक्त २,४४३ रु. प्रतिटन देत आहेत.
पहिला हप्ता : २,४००
उर्वरित : ४३ रुपये (साखर रिकव्हरीनुसार)
हा दर शेतकऱ्यांसाठी तोट्याचा असल्याने तीव्र आंदोलने उफाळली आहेत.
सहकारमंत्र्यांवरील थेट आरोप
१६ नोव्हेंबरला समितीने सहकारमंत्र्यांची भेट घेतली. या बैठकीत मंत्र्यांच्या कारखान्यांकडून २,५०० रु. पर्यंतचा कमी दर दिला जात असल्याचे उघड झाले. या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला.
मंत्र्यांच्याच कारखान्यात अन्याय होत असताना न्याय कुणाकडून मिळणार? असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. याच पार्श्वभूमीवर २४ नोव्हेंबरला सात तासांचा रास्ता रोको करण्यात आला.
'कोयता बंद'ची घोषणा आणि ट्रॅक्टरची हवा सोडणे सुरू
कारखान्यांनी प्रतिसाद न दिल्याने आता ऊसतोड मजूरही आंदोलनात उतरले.
कोयता बंद करून ऊसतोडीला ब्रेक
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे टायरची हवा सोडणे सुरू
वाहतूक ठप्प; रस्त्यांवर ट्रॉली रांगा
हे आंदोलन आता पूर्णपणे जनआंदोलनाच्या स्वरूपात येत आहे.
माजलगावातील ६ कारखान्यांना बंद करण्याचा इशारा
माजलगाव तालुका व परिसरात ६ साखर कारखाने, ३ गुऱ्हाळ (क्रशिंग युनिट)
'कोयता बंद'मुळे या कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे; मात्र इतर आंतरिक उत्पादने बनविणे सुरू आहे.
शेतकरी समितीने सांगितले की, ३ दिवसांत निर्णय झाला नाही तर सर्व कारखाने बंद पाडू.
ग्रामपंचायतींचा वाढता पाठिंबा
वडवणी तालुक्यातील ३५ पैकी ३० ग्रामपंचायतींनी लेखी पाठिंबा दिला आहे. आता माजलगाव, वडवणी, अंबाजोगाई, परभणी येथील ग्रामपंचायती, संघटना आणि स्थानिक नेते मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत. आंदोलन आणखी व्यापक होणार, हे निश्चित आहे.
आंदोलनाचा प्रवास
३१ ऑक्टोबर : गुऱ्हाळ बंद करून आंदोलनाची सुरुवात
४ नोव्हेंबर : व्यापक बैठक, रास्ता रोकोचा निर्णय
७ नोव्हेंबर : पहिला रास्ता रोको
१९ नोव्हेंबर : गावागावात भोंगा, टायर जाळणे, निदर्शने
२४ नोव्हेंबर : माजलगावात सात तास रास्ता रोको
२५ नोव्हेंबर : जिल्हाधिकारी, कारखानदार, शेतकरी बैठक निष्फळ
सध्या : 'कोयता बंद', वाहनांच्या टायरची हवा काढणे, कारखान्यांचे गाळप ठप्प
प्रशासन आणि कारखानदारांचे दुर्लक्ष
शेतकऱ्यांनी आरोप केला आहे की, प्रशासनाने गंभीर दखल घेतली नाही तसेच कारखानदार वरिष्ठ बैठकीला हजर नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.
मागील वर्षी २,७०० रुपये दिले; यंदा २,४०० यंदा दर उलट कमी!
यामुळे आंदोलन अधिक तापले असून, शेतकरी आता माघार घेण्याच्या मूडमध्ये नाहीत.
पोलिसांची कारवाई
रस्त्यावर ठिय्या मांडणाऱ्या शेतकऱ्यांना ताब्यात
वाहतूककोंडी झाल्याने हस्तक्षेप
१० आंदोलकांवर प्रतिबंधात्मक कारवाई
हे ही वाचा सविस्तर : Sugarcane Workers Story : थंडीतही हातात कोयता… ऊस कामगारांचे आयुष्य संघर्षमयच
Web Summary : Sugarcane farmers in Marathwada intensify protests demanding higher prices. The 'Koyta Band' (tools down) movement disrupts harvesting, with farmers deflating tractor tires. An ultimatum: resolve price issues in three days or face factory shutdowns. Farmers demand ₹3,000/ton initially and ₹4,000/ton final, protesting current ₹2,443/ton rates.
Web Summary : मराठवाड़ा में गन्ना किसान अधिक कीमतों की मांग को लेकर आंदोलन तेज कर रहे हैं। 'कोयता बंद' आंदोलन से कटाई बाधित, किसानों ने ट्रैक्टर के टायर पंक्चर किए। तीन दिन में कीमत मसले का समाधान करने या कारखाने बंद करने की चेतावनी। किसान ₹3,000/टन शुरुआती और ₹4,000/टन अंतिम मांग कर रहे हैं, वर्तमान ₹2,443/टन दरों का विरोध कर रहे हैं।