पुणे : राज्यात अखेर २०२४-२५ या गाळप हंगामाची सांगता झाली आहे. साखर आयुक्तालयाने अंतिम गाळप अहवाल जाहीर केला असून यंदा २०० साखर कारखान्यांनी गाळप केले. (Sugarcane Crushing Season)
मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. कमी ऊस क्षेत्र, हवामानातील बदल आणि साखर उताऱ्यात घट यामुळे हंगाम अपेक्षेपेक्षा कमी गोड ठरला आहे. (Sugarcane Crushing Season)
राज्यातील लांबलेल्या साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाची सांगता झाली आहे. यंदाच्या हंगामातील २०० साखर कारखान्यांनी आपले गाळप थांबवले असून साखर आयुक्तालयाने अखेर शेवटचा गाळप अहवाल जारी केला आहे. (Sugarcane Crushing Season)
यंदा राज्यातील ९९ सहकारी आणि १०१ खाजगी असे मिळून २०० साखर कारखान्यांनी गाळप केले होते. तर मागच्या हंगामात म्हणजेच २०२३-२४ या हंगामात राज्यातील २०८ साखर कारखान्यांनी गाळप केले होते. मागील हंगामाच्या तुलनेत यंदा मात्र उसाचे गाळप आणि साखरेचे उत्पादनही कमी झाले असून साखर उतारा घटला आहे. (Sugarcane Crushing Season)
साखर उत्पादन किती?
* यंदाच्या हंगामात ८ कोटी ५४ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. तर ८१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
* मागील हंगामात मात्र १० कोटी ७६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप आणि ११० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. मागच्या वर्षीच्या तुलनेत राज्यात २९ लाख टन साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. * यंदा साखर उतारा हा ९.४८% एवढा होता. तर मागच्या हंगामातील साखर उतारा हा १०.२७% एवढा होता.
ऊस क्षेत्र कमी
* ऊस गाळप हंगाम २०२३-२४ च्या तुलनेत यंदा उसाखालील क्षेत्र हे १ लाख हेक्टरने कमी होते. त्यानुसार गाळप हंगाम हा मार्च महिन्यापर्यंत चालण्याची शक्यता होती पण मे महिन्याच्या मध्यापर्यंत गाळप हंगाम चालला आहे.
* काही कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये राहिलेला ऊस आता संपला असून अधिकृतरित्या गाळपाची सांगता झाली आहे.
आतापर्यंतचा गाळप हंगाम
हंगाम | गाळप कारखाने | गाळप (मेट्रिक टन) | साखर उत्पादन (लाख टन) | साखर उतारा (%) |
---|---|---|---|---|
२०२३-२४ | २०८ | १०.७६ कोटी | ११० | १०.२७ |
२०२४-२५ | २०० | ८.५४ कोटी | ८१ | ९.४८ |
विभागवार साखर उत्पादन
विभाग | साखर उत्पादन (लाख क्विंटलमध्ये) |
कोल्हापूर | २२४.६ |
पुणे | २०१.७७ |
सोलापूर | १०७.५७ |
अहिल्यानगर | १०२.१६ |
छत्रपती संभाजीनगर | ६५.२५ |
नांदेड | ९५.४६ |
अमरावती | १०.३४ |
नागपूर | १.९३ |