Spraying With Drones : शेतीत तंत्रज्ञानाचा वाढता वापर आता गावोगावी पोहोचत असून, यंदाच्या खरीप हंगामात महिला बचतगटांच्या माध्यमातून शेतशिवारात ड्रोनद्वारे फवारणीचा अभिनव प्रयोग राबविण्यात येणार आहे. (Spraying With Drones)
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ३२ हजार एकर क्षेत्रावर ही फवारणी होणार असून, एका तालुक्यातील एका ड्रोनला २ हजार एकर क्षेत्राचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.(Spraying With Drones)
महिला बचतगटांचा नवा चेहरा
महिला बचतगटांना ड्रोन उडविण्याचे विशेष प्रशिक्षण देऊन त्यांचे लायसन्सही सुपूर्द करण्यात आले आहे. प्रशिक्षणानंतर महिलांना प्रत्यक्ष शेतशिवारात काम करण्यापूर्वी ट्रायल फवारणी करून घेण्यात येणार आहे. (Spraying With Drones)
यातून महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव तर मिळेलच, पण त्यांना गावपातळीवर रोजगाराचाही नवा मार्ग खुला होणार आहे.
शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च वाचणार
ड्रोनद्वारे फवारणी केल्यामुळे पंपाद्वारे होणारे नुकसान टळणार आहे. कमी वेळेत मोठ्या क्षेत्रावर औषध फवारणी होऊन शेतकऱ्यांचा श्रम, वेळ आणि औषधीचा खर्च वाचणार आहे. शिवाय, रोग-कीड नियंत्रणात वेगाने आणि प्रभावीपणे काम होईल.
३२ हजार एकरवर होणार प्रयोग
महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सुनील सोसे यांनी सांगितले की, यंदा जिल्ह्यातील महिला बचतगटांमार्फत एकूण ३२ हजार एकरवर ड्रोन फवारणीचा प्रयोग होईल. प्रशिक्षणानंतर पुन्हा ट्रायल राबवून उणिवा दूर केल्या जातील आणि त्यानंतर खरीप हंगामात प्रत्यक्ष फवारणी सुरू होईल.
महिला बचतगटांच्या माध्यमातून यावर्षी शेत शिवारात ड्रोनने फवारणी करण्याचा प्रयोग राबविला जाणार आहे. त्याचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. एक वेळा ट्रायल प्रशिक्षणातून त्यातील उणिवा दूर केल्या जाणार आहे. ३२ हजार हेक्टरवर ही फवारणी होणार आहे.- सुनील सोसे, जिल्हा समन्वयक, महिला आर्थिक विकास महामंडळ, यवतमाळ