Join us

Soyabean Kharedi : सोयाबीन खरेदीची मुदत संपण्याआधी नवीन बारदाना टेंडर, नेमकं चाललंय काय?

By सुनील चरपे | Updated: January 11, 2025 18:09 IST

Soyabean Kharedi : आठवडाभरापासून बारदान्याअभावी बहुतांश केंद्रांवरील साेयाबीन खरेदी बंद आहे.

- सुनील चरपे

नागपूर : राज्य सरकारने नाफेड व एनसीसीएफच्या (NAFED, NCCF) मदतीने राज्यात ५६२ साेयाबीन खरेदी केंद्र (Soyabean Kharedi Kendra) सुरू केले. या दाेन्ही संस्थांना १४ लाख १३ हजार मेट्रिक टन साेयाबीन खरेदीचे उद्दिष्ट्य दिले. या संस्थांनी तीन महिन्यांत केवळ ३० टक्केच उद्दिष्ट्य पूर्ण केले. १२ जानेवारीला या खरेदीची मुदत संपणार असून, आठवडाभरापासून बारदान्याअभावी बहुतांश केंद्रांवरील साेयाबीन खरेदी बंद आहे.

केंद्र सरकारने चालू हंगामासाठी साेयाबीनची एमएसपी (Soyabean MSP) ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल जाहीर केली. खरेदी हंगाम सुरू हाेताच खुल्या बाजारात साेयाबीनचे दर (Soyabean Market) प्रतिक्विंटल २,९०० रुपयांपर्यंत खाली आले हाेते. त्यानंतर हेच दर ३,७०० ते ४,००० रुपयांच्या आसपास स्थिरावले. विधानसभा निवडणुकीमुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर २०२४ च्या पहिल्या आठवड्यात नाफेड व एनसीसीएफच्या मदतीने एमएसपी दरात १४ लाख १३ हजार मेट्रिक टन साेयाबीन खरेदीचा निर्णय घेतला.

या दाेन्ही संस्थांनी १४ ऑक्टाेबर २०२४ पासून खरेदी केंद्र चालू करायला सुरुवात केली. सुरुवातीपासून आजवर या खरेदीचा वेग खूपच संथ राहिला. त्यातच डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून खरेदी केंद्रांवर बारदान्याची टंचाई जाणवायला लागली. जानेवारीच्या सुरुवातीला किमान ४८ लाख पाेत्यांची गरज निर्माण झाल्याने बहुतांश केंद्रांवरील साेयाबीन खरेदी बंद करण्यात आली.

बैठक व टेंडरचे वरातीमागून घाेडेहा तिढा साेडविण्यासाठी पणनमंत्री जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांनी बुधवारी  मंत्रालयात विशेष बैठक बाेलावली हाेती. या बैठकीत त्यांनी नाफेडच्या अधिकाऱ्यांना बारदान्याची तातडीने व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. त्यावर चार दिवसा बारदाना उपलब्ध करून देण्याची ग्वाही नाफेडच्या अधिकाऱ्यांनी दिली आणि गुरुवारी नवीन बारदान्याचे टेंडर मागविले. रविवारी साेयाबीन खरेदीची मुदत संपणार असल्याने बैठक व टेंडरला काय अर्थ उरताे?

जुजबी उपाययाेजनासाेयाबीन भरण्यासाठी ५० किलाे क्षमतेच्या पाेत्यांचा वापर केला जाताे. या पाेत्यांवर नाफेडचा लाेगाे, स्टॅम्प व इतर माहिती प्रिंट केलेली असते. एकूण उद्दिष्टाच्या किमान ७० टक्के साेयाबीन नाफेडला खरेदी करावयाची हाेती. त्यासाठी नेमक्या किती पाेत्यांची आवश्यकता आहे, हे नाफेडच्या अधिकाऱ्यांना सप्टेंबर २०२४ मध्ये का कळले नाही?, आता शेतकऱ्यांचा राेष कमी करण्यासाठी नाफेडने सुस्थितीत व प्रिंट असलेली जुनी पाेती वापरण्याचा फतवा नाफेडने काढला.

एकूण साेयाबीन खरेदी केंद्र : ५६२नाफेड : ४०३एनसीसीएफ :  १५९

नाेंदणीकृत शेतकरी : ७ हजार ७७ हजार ७५७नाफेड :  ५ हजार ६४ हजार ५२३एनसीसीएफ : २ हजार १३ हजार २३४

साेयाबीन खरेदी केलेले एकूण शेतकरी : २ लाख २२ हजार ५२नाफेड : १ लाख ५३ हजार ८८६एनसीसीएफ :-६८ हजार १६६साेयाबीन खरेदी न केलेले नाेंदणीकृत शेतकरी :- ५ लाख ५५ हजार ७०५ (शिल्लक)

एकूण साेयाबीन खरेदी : ४ हजार ५८ हजार ३१३ मेट्रिक टन.नाफेड :- ३ लाख ३० हजार ८०३ मेट्रिक टन.एनसीसीएफ : १ लाख २७ हजार ५१० मेट्रिक टन.(ही आकडेवारी ९ जानेवारी २०२५ पर्यंतची आहे.) 

टॅग्स :सोयाबीनकृषी योजनाशेतीमार्केट यार्ड