Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > कोणतेच राज्य दर पाच वर्षांनी... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफीविषयी काय म्हणाले? 

कोणतेच राज्य दर पाच वर्षांनी... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफीविषयी काय म्हणाले? 

Latest News Shetkari Karjmafi what says Chief Minister Devendra Fadnavis about loan waiver | कोणतेच राज्य दर पाच वर्षांनी... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफीविषयी काय म्हणाले? 

कोणतेच राज्य दर पाच वर्षांनी... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफीविषयी काय म्हणाले? 

Shetkari Karjmafi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत कर्जमाफीविषयी मत व्यक्त केले. 

Shetkari Karjmafi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत कर्जमाफीविषयी मत व्यक्त केले. 

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीच्या (Karjmafi) प्रतीक्षेत होते. राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा प्रतीक्षाच करावी लागणार असल्याचे चित्र आहे. कारण यंदाच्या पावसाळी अधिवेशनात केवळ चर्चे व्यतिरिक्त काहीच न झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट वक्तव्य केले आहे. 

आज विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Pavsali Adhiveshan) राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले.  जवळपास वीस चाललेल्या या अधिवेशनात केवळ सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये  हेवेदावे झाल्याचे पाहण्यात आले. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीचा विषय दूरच राहिला. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत कर्जमाफीविषयी थोडक्यात मत व्यक्त केले. 

मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra fadnavis) म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आम्ही दिले होते ते पूर्ण करणारच, पण कर्जमाफी हा तत्कालिक उपाय आहे. कोणतेच राज्य दर पाच वर्षांनी कर्जमाफी देऊ शकत नाही. पण आम्ही शेतकऱ्यांसाठी कधीही हात आखडता घेतलेला नाही. शेतक-यांचे जीवन सुखाचे व्हावे, त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्या लागतील, त्याच्याच शिफारशी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन समिती स्थापन केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  सांगितले. 

दरम्यान विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन दि. ८ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे होणार असल्याची घोषणा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली.

 

Web Title: Latest News Shetkari Karjmafi what says Chief Minister Devendra Fadnavis about loan waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.