Shetkari Apghat Yojana : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान (Shetkari Apghat Yojana) योजनेअंतर्गत" सन २०२४-२५ या वर्षातील मंजूर प्रस्ताव निकाली काढण्यासाठी, चालू आर्थिक वर्षामध्ये केलेल्या अर्थसंकल्पिय तरतुदीतून रक्कम ४० कोटी तसेच न्यायालयीन प्रकरणासाठी एकूण १ लाख ३२ हजार रुपये इतके अनुदान, मंजूर करण्यात आले आहे. असे एकूण ४० कोटी ०१ लाख ३२ हजार इतके अनुदान आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
प्रस्तुत खर्च योजनेच्या लेखाशिर्षाखाली सन २०२४-२५ करिता मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून भागविण्यात यावा, असे सांगण्यात आले आहे. सदर शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात येणारा निधी शासन निर्णयात नमूद तरतूदीनुसार खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे यांची राहील. उपरोक्त प्रमाणे उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या निधीच्या विनियोगाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे शासनास सादर करतील.
सदर शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात येणारा निधी शासन निर्णयात नमूद तरतूदीनुसार खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे यांची राहील. उपरोक्त प्रमाणे उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या निधीच्या विनियोगाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे शासनास सादर करतील.
प्रस्तुत योजनेच्या प्रयोजनार्थ आयुक्तालय स्तरावर आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना "नियंत्रण अधिकारी" व सहाय्यक संचालक, लेखा-१, यांना "आहरण व संवितरण अधिकारी" म्हणून, तसेच, जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांना "नियंत्रण अधिकारी" आणि संबंधित जिल्हयाच्या जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील लेखाधिकारी यांना, "आहरण व संवितरण अधिकारी" म्हणून काम पाहतील.