Join us
Daily Top 2Weekly Top 5

Seed Rate : परभणी कृषी विद्यापीठाकडून बियाण्यांचे दरपत्रक जाहीर; कोणते वाण कितीला? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 12:09 IST

Seed Rate : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. परभणी कृषी विद्यापीठाच्या बीज प्रक्रिया केंद्रामार्फत ज्वारी, तूर, मूग, सोयाबीन आणि बाजरी या पिकांच्या सत्यतादर्शक बियाण्यांची विक्री सुरू करण्यात आली असून त्यांचे अधिकृत दरपत्रक जाहीर करण्यात आले आहे. कोणत्या वाणाचे बियाणे किती दराने मिळणार, याची माहिती जाणून घेण्यासाठी ही बातमी शेवटपर्यंत वाचा.(Seed Rate)

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत बीज प्रक्रिया केंद्रामार्फत खरीप हंगाम २०२६ साठी विविध पिकांच्या प्रमाणित बियाण्यांचे दरपत्रक जाहीर करण्यात आले आहे. (Seed Rate)

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी ज्वारी, मूग, तूर, सोयाबीन आणि बाजरी या पिकांच्या विविध वाणांची विक्री सुरू करण्यात आली आहे.(Seed Rate)

विद्यापीठाने जाहीर केलेल्या दरपत्रकानुसार ज्वारीच्या 'परभणी शक्ती' वाणाचे बियाणे प्रतिकिलो १२५ रु. दराने उपलब्ध असून ४ किलोच्या बॅगची किंमत ५०० रु. ठेवण्यात आली आहे.(Seed Rate)

मूग पिकासाठी 'बीएम-२००३-२' हा वाण प्रतिकिलो २२० रु. दराने उपलब्ध असून ६ किलोच्या बॅगची किंमत १,३२० रु. इतकी आहे.

तूर पिकासाठी 'बीडीएन-१३-४१ गोदावरी (पांढरी)' आणि 'बीडीएन-७१६ (लाल)' हे वाण विक्रीस ठेवण्यात आले आहेत. या बियाण्यांचा दर प्रतिकिलो २५० रु. असून २ किलो बॅग ५०० रु. तर ६ किलो बॅग १५००रु. दराने उपलब्ध आहे.

सोयाबीन पिकासाठी 'एमएयूएस-१६२' आणि 'एमएयूएस-६१२' हे वाण प्रतिकिलो १०० रु. दराने उपलब्ध असून २६ किलोच्या बॅगची किंमत २,६०० रु. ठेवण्यात आली आहे.

तसेच बाजरीच्या 'एचबी-१२००' वाणाचे बियाणे प्रतिकिलो १९० रु. दराने उपलब्ध असून १.५ किलो बॅग २८५ रु. मध्ये मिळणार आहे.

बीज प्रक्रिया केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संतोष अशोकराव शिंदे यांनी शेतकऱ्यांनी वेळेत बियाण्यांची खरेदी करून खरीप हंगामाची तयारी पूर्ण करावी, असे आवाहन केले आहे.

बियाण्यांच्या उपलब्धतेसंदर्भात अधिक माहितीसाठी विद्यापीठाने पारस एम. पवार (९२८४७२४४८३), किरण जाधव (७७७३९४१०१०) यांच्याशी संपर्क साधावा, असे कळवले आहे.

हे ही वाचा सविस्तर :Seed Germination Test : चमकदार बियाण्यांना फसू नका; पेरणीपूर्वी 'ही' टेस्ट कराच

अधिक वाचा :Kharif Season : खरीपपूर्वीच शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी; काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani Agricultural University Announces Seed Rates for Kharif Season 2026

Web Summary : Parbhani Agricultural University released seed rates for Kharif 2026. High-quality seeds of Jowar, Moong, Tur, Soybean, and Bajra are available. Farmers are encouraged to purchase seeds promptly for the upcoming season.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीकृषी विज्ञान केंद्र