Jalyukt Shiwar Yojana : सन २०२४-२५ साठी जलयुक्त शिवार अभियान (Jalyukt Shiwar Yojana) २.० विशेष निधी सुधारित अंदाजाच्या मर्यादेत १४१ कोटी रुपयांचा निधी जिल्हानिहाय वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. त्यानुसार आता नव्याने जलयुक्त शिवार योजनेच्या अंतर्गत पूर्ण झालेल्या / सुरु असलेल्या कामांना निधी मिळण्यास मदत होणार आहे.
जलयुक्त शिवार अभियान Jalyukt Shiwar Abhiyan) २.० सुरू करण्यात आले आहे. सन २०२४-२५ साठी जलयुक्त शिवार अभियान २.० करिता विशेष निधी ४४०२ २७८१ अंतर्गत ६५० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पित आहे. तर ३५० कोटी रुपयांची सुधारित तरतूद मंजूर झालेली आहे. सदर योजनेंतर्गत जिल्हयाच्या प्रस्तावित कामांच्या किंमतीस अनुसरून सन २०२४-२५ साठी जिल्हानिहाय उपलब्ध होणाऱ्या प्रस्तावित तरतूदी / निधी बाबत सर्व जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले आहे.
इथे वाचा संपूर्ण शासन निर्णय आणि जिल्हानिहाय यादी
त्यानुसार जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत पूर्ण झालेल्या / सुरु असलेल्या कामांची देयके अदा करण्याकरिता सुधारीत अंदाजाच्या मर्यादेमध्ये १४१ कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार आज शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
आयुक्त, मृद व जलसंधारण यांनी सदरहू निधी तात्काळ जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्याकडे वर्ग करावा. तसेच उपलब्ध करुन देण्यात आलेला निधी जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत निवडलेल्या गावातील झालेल्या कामांसाठीच खर्च करण्यात यावा, अशी सूचना देखील देण्यात आली आहे.