Join us
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्याला जायची गरज नाही, सातबाऱ्याची सगळी कामे एकाच दिवशी एकाच ठिकाणी होतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 13:40 IST

Maharajswa Abhiyan : महसूल विभागाच्या सेवा थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचाव्यात, हा या अभियानाचा हेतू आहे. 

गोंदिया :  राज्यात १८ फेब्रुवारी ते १५ मे या कालावधीत 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिर अभियान राबविण्यात येत आहे. सामान्यांची कामे वेळेत व्हावीत आणि महसूल विभागाच्या सेवा थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचाव्यात, हा या अभियानाचा हेतू आहे. 

एकाच छताखाली मिळणार 'या' सेवाशिबिरात महसूल दस्तऐवज, प्रलंबित फेरफार निकाल, ७/१२ दुरुस्ती यांसारखी कामे केली जातील. तसेच उत्पन्न, रहिवासी, जात आणि नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्रांचे वाटप् 'सिंगल विंडो' (एक खिडकी) प्रणालीद्वारे करण्यात येईल. अर्ज स्वीकारणे, पडताळणी आणि सेवा वितरण ही सर्व प्रक्रिया तातडीने राबविली जाणार आहे.

अकृषक तरतुदी सुधारणा मार्गदर्शनयामध्ये अकृषिक रूपांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक नसणे (कलम ४२ मधील सुधारणा). संपुष्टात आणलेल्या सनद प्रणालीबाबत (कलम ४२ अ, ब, क, ड) एकच वेळचे अधिमूल्य भरण्याची नवीन व्यवस्था. डिजिटल ७-१२ ला कायदेशीर वैधताबाबत जनजागृती करणे.

सुधारणा व नागरी सुविधायामध्ये एक खिडकी व्यवस्था. शिबिरादरम्यान ई-मोजणी, अॅग्रीस्टॅक, पी. एम. किसान, तक्रार निवारण आदी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या टप्प्यात खासगी जमिनीचे भूसंपादन झाल्यानंतरही प्रत्यक्षात कमी-जास्त पत्रक तयार करून गाव दप्तरातील सर्व नोंदी अद्ययावत न केल्यामुळे गाव दप्तराची उभारणी केली आहे.

"महसूल विभागाच्या सेवा थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवून प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. ७ मार्चपासून सुरू होणाऱ्या या शिबिरांचा लाभघेण्यासाठी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. एकाच छताखाली सर्व दाखले आणि फेरफार निकाली काढून आम्ही शंभर टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.- प्रांजली चिरडे, तहसीलदार, सावली

 

 

जमीन मोजणी केली, पण मोजणीत तफावत आढळत आहे, काय करावे? वाचा संपूर्ण प्रक्रिया

 

English
हिंदी सारांश
Web Title : No need to go to Taluka, 7/12 work done in one day!

Web Summary : Solve 7/12 issues in one day! Maharashtra's 'Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Abhiyan' offers single-window services for revenue documents, certificates, and land record updates. Benefit from e-measurement, PM Kisan, and grievance redressal services at camps starting March 7th.
टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतीशेतकरी