Join us
Daily Top 2Weekly Top 5

कांदा पट्ट्यात 100 एकरांवर राजमा, एकरी बारा हजार खर्च अन् दीड लाखांचे उत्पन्न, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 19:35 IST

Rajma Farming : शेतात वेगवेगळी पिके घेऊन त्यातून उत्पन्न कसे मिळतील याचा प्रयत्न करत आहे.

नाशिक : यंदा शेतकरीकांदा पिकाला फाटा देऊन त्याऐवजी शेतात वेगवेगळी पिके घेऊन त्यातून उत्पन्न कसे मिळतील याचा प्रयत्न करत आहे. येवला तालुक्यातील शंभरावर शेतकऱ्यांनी राजमा पीक घेतले आहे. 

हे पीक मराठवाड्याच्या जालना, बीड भागात घेतले जाते. अतिवृष्टीने पिके नष्ट झाली. त्याचाच फायदा घेत येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी "राजमा" पीक घेतले आहे. जवळपास १०० एकर क्षेत्रावर राजमा पीक घेतले असून, त्याला ८ ते ९ हजार रुपये क्विंटल प्रमाणे दर मिळत असून, एका एकरासाठी साधारणपणे दहा ते बारा हजार रुपये खर्च येत आहे. एकरी दीड लाखाचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

एकरी दीड लाखाचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षाकांद्याला मोठ्या प्रमाणात खर्च करूनही हाती काही लागले नाही. म्हणून शेतात थोडा बदल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मागील वर्षी 'राजमा'चे पीक तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतले होते. त्यामुळे यावर्षी एक एकर राजमाचे पीक घेतले आहे. 

आतापर्यंत चार हजार रुपये बियाणे, चार हजार रुपये खते आणि तीन हजार रुपये औषधे, असा साधारणपणे ११ हजार रुपये खर्च आला. एका एकरासाठी साधारणपणे दहा ते बारा हजार रुपये खर्च येत आहे. एकरी दीड लाखाचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. 

राजमा पिकाला खर्च कमीराजमा पिकाला खर्च कमी प्रमाणात येत असल्याने, औषधे कमी लागत असल्याने एकरी साधारणपणे दहा ते पंधरा हजार रुपये खर्च येतो. परंतु एकरी उत्पादन १५ क्विंटल ते २० क्विंटलपर्यंत उत्पादन निघते. साधारणपणे आपल्याकडे २० दिवसांत 'राजमा'चे पीक काढणीस येते.

येवला तालुक्यात जवळपास शंभर एकर क्षेत्रावर राजमाचे पीक शेतकऱ्यांनी घेतले आहे. त्यामुळे इतर पिकापेक्षा खर्चही कमी प्रमाणात आला. उत्पादनही साधारणपणे १८ ते २० क्विंटलपर्यंत निघेल, अशी अपेक्षा आहे. - नारायण शिंदे, राजमा शेतकरी, आडगाव चोथवा, ता. येवला

English
हिंदी सारांश
Web Title : Yeola Farmers Embrace Rajma: Higher Profits, Lower Costs on 100 Acres

Web Summary : Farmers in Yeola are shifting from onion to rajma farming across 100 acres. Lower investment yields higher profits, with farmers expecting ₹1.5 lakh per acre. This shift offers a promising alternative after onion crop losses.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीकांदाशेतकरी