Join us

Rabbi Jawar Maize Crop : रब्बी ज्वारीसाठी आंतरमशागत आणि मका पेरणीसाठी कृषी सल्ला, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 13:36 IST

Rabbi Jawar Maize Crop : अशावेळी रब्बी ज्वारीसाठी (Sorghum Sowing) आंतरमशागत आणि मकासाठी पेरणीसाठी (Maize Farming) कशी तयारी करावी, हे या लेखातून जाणून घेणार आहोत... 

Rabbi Jawar Maize Crop :रब्बी हंगामाला सुरवात झाली असून शेतकरी पेरणी, लागवडीपूर्व कामांमध्ये व्यस्त आहेत. रब्बी हंगामात गहू, हरभरा या पिकांबरोबर मका, ज्वारी आदी पिकांची लागवड करण्यावर भर दिला जात आहे. अशावेळी रब्बीज्वारीसाठी (Sorghum Sowing) आंतरमशागत आणि मकासाठी पेरणीसाठी (Maize Farming) कशी तयारी करावी, हे या लेखातून जाणून घेणार आहोत... 

रब्बी ज्वारी पिकासाठी... 

पेरणीनंतर १५ दिवसांनी विरळणी करून एका ठिकाणी एक रोप ठेवावे व पेरणीनंतर ३ आठवड्यांने फटीच्या कोळप्याने पहिली कोळपणी करावी. दुसऱ्या पंधरवड्यात खोडकिडाचा प्रादुर्भाव दिसल्यास क्विनालफॉस २५ ईसी ७५० मिली प्रवाही ५०० लीटर पाणी हेक्टरी फवारणी करावी. आवश्यकतेनुसार पहिली खुरपणी करावी. पेरणीनंतर ८ आठवड्याने दातेरे कोळप्याने दुसरी कोळपणी करावी आणि गरज असल्यास पहिले संरक्षित पाणी द्यावे.

रब्बी मका पिकासाठी.... 

पाण्याची उपलब्धता असल्यावरच रब्बी मका पिकाची पेरणी करावी. रब्बी हंगामात मका पेरणी १५ नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करावी. पेरणीसाठी एकरी ६ ते ८ किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास थायरम हे बुरशीनाशक २.५ ग्रॅम आणि सायअन्ट्रानिलीप्रोल (१९.८%) थायमिथोक्झाम (१९.८% एफएस) हे संयुक्त कीटकनाशक ६ मिली या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. 

रासायनिक बीजप्रकियेनंतर, अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जीवाणू संवर्धक प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. रब्बी हंगामात सरी-वरंबा पद्धतीचा अवलंब करावा. उशिरा व मध्यम कालावधीच्या जातींसाठी ७५ x २० सें.मी. तर लवकर पक्व होणाऱ्या जातींसाठी ६० x २० सें.मी. अंतरावर सरीच्या बगलेत मध्यावर एका बाजूला टोकण पद्धतीने ४ ते ५ सें.मी. खोलीवर पेरणी करावी.

- ग्रामीण मौसम कृषी सेवा, विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :मकाज्वारीरब्बीखरीपशेती क्षेत्रशेती