Join us
Daily Top 2Weekly Top 5

POCRA Yojana :'पोकरा'त 'या' जिल्ह्यात ८६० शेतकऱ्यांची निवड; अनुदान वाटप सुरू वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 14:32 IST

POCRA Yojana : राज्य शासनाच्या 'नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प' अर्थात पोकरा योजनेअंतर्गत तब्बल ८६० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून, विविध योजनांमधील अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे. सूक्ष्म सिंचन, फळबाग लागवड, कृषी अवजारे बँक यांसह अनेक योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे.(POCRA Yojana)

POCRA Yojana : राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात 'पोकरा' अंतर्गत अकोला जिल्ह्यातील विविध योजनांसाठी तब्बल ८६० पात्र शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. (POCRA Yojana)

त्यांना योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून शुक्रवारी देण्यात आली.(POCRA Yojana)

या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील १४९ गावांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या गावांमधील शेतकऱ्यांना शेती उत्पादन वाढ, पाण्याचा कार्यक्षम वापर आणि शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी विविध योजनांचा लाभ दिला जात आहे.(POCRA Yojana)

कोणत्या योजनांचा मिळणार लाभ?

'पोकरा' प्रकल्पामार्फत शेतकऱ्यांसाठी खालील महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

सूक्ष्म सिंचन योजना, फळबाग लागवड, बीजोत्पादन कार्यक्रम, नॅडेप कंपोस्ट निर्मिती, शेतकरी गटांसाठी कृषी अवजारे बँक, बीज प्रक्रिया युनिट, कृषी मॉल व गोदाम उभारणी या सर्व योजनांमध्ये शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते.

ऑनलाइन अर्जानंतर निवड

प्रकल्पाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पोकरा प्रकल्पाच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. 

अर्ज केलेल्या पात्र शेतकऱ्यांमधून जिल्ह्यातील ८६० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून, त्यांना टप्प्याटप्प्याने योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.

तालुकानिहाय निवड झालेली गावे

प्रकल्पांतर्गत निवड करण्यात आलेल्या गावांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे 

अकोला : २० गावे

बाळापूर : १२ गावे

बार्शिटाकळी : ३८ गावे

पातूर : १९ गावे

मूर्तिजापूर : १४ गावे

तेल्हारा : १५ गावे

अकोट : ३१ गावे

लाभ प्रक्रियेला सुरुवात

प्रकल्पात समाविष्ट विविध योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, आगामी काळात आणखी पात्र शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळणार आहे.

शेतकऱ्यांनी वेळेत ऑनलाइन अर्ज करून आवश्यक कागदपत्रे पूर्ण करावीत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

प्रकल्पातील योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत जिल्ह्यातील ८६० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी पोर्टलवर अर्ज करून योजनांचा लाभ घ्यावा.- विलास वाशिमकर, तंत्र अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय

हे ही वाचा सविस्तर :Namo Shetkari Yojana : 'नमो शेतकरी'चा हप्ता कुठे अडला? बँक, कृषी कार्यालयांत शेतकऱ्यांची गर्दी

English
हिंदी सारांश
Web Title : Akola: 860 Farmers Selected for POCRA Yojana; Subsidy Distribution Begins

Web Summary : In Akola, 860 farmers are selected under POCRA Yojana for schemes boosting farm production and water efficiency. Subsidies are provided for micro-irrigation, orchards, seed production, and farm equipment. Application process details are available on the official portal.
टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतकरीशेती