PM Vishwakarma Yojana : गावगाड्यातील पारंपरिक व्यवसायांना नवसंजीवनी देण्यासाठी केंद्र सरकारकडून राबविण्यात येणारी 'प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना' सध्या कारागिरांसाठी मोठा आधार ठरत आहे.(PM Vishwakarma Yojana)
सुतार, लोहार, सोनार, कुंभार, नाभिक अशा १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत, कौशल्य प्रशिक्षण आणि आधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून दिली जात आहे.(PM Vishwakarma Yojana)
५% व्याजदरात ३ लाखांपर्यंत कर्ज
या योजनेची सर्वात मोठी आकर्षक बाब म्हणजे कमी व्याजदरात कर्ज सुविधा. पात्र कारागिरांना टप्प्याटप्प्याने कर्ज दिले जाते.
पहिला टप्पा : १ लाख रुपये
दुसरा टप्पा : २ लाख रुपये
एकूण ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज केवळ ५% व्याजदराने उपलब्ध होते.
यामुळे लघु व्यवसाय वाढविण्यासाठी कारागिरांना मोठा आर्थिक आधार मिळत आहे.
प्रशिक्षण आणि साधनांसाठी अनुदान
योजनेअंतर्गत कारागिरांना केवळ आर्थिक मदतच नाही, तर कौशल्यवृद्धीवरही भर दिला जातो.
प्रशिक्षण काळात दररोज ५०० रुपये मानधन
आधुनिक साधनसामग्री खरेदीसाठी १५,००० रुपये अनुदान
यामुळे पारंपरिक व्यवसाय अधिक आधुनिक आणि स्पर्धात्मक बनविण्यास मदत होत आहे.
१८ प्रकारच्या कारागिरांचा समावेश
या योजनेत विविध पारंपरिक व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे, त्यात प्रमुखतःसुतार, लोहार, सोनार, कुंभार, नाभिक, मोची, टेलर, गवंडी, माती शिल्पकार, दगडकाम करणारे, जाळी तयार करणारे आदी कारागिरांचा समावेश आहे.
जिल्ह्यात हजारो लाभार्थी
खामगाव आणि परिसरात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत हजारो कारागिरांनी याचा लाभ घेतला आहे. अनेकांना कर्ज व अनुदान मिळून व्यवसाय उभारणीस चालना मिळाली आहे.
अंमलबजावणीत अडचणी
योजना प्रभावी असली तरी काही अडथळेही समोर येत आहेत
ग्रामीण भागात जागरूकतेचा अभाव
ऑनलाइन अर्ज प्रक्रियेतील अडचणी
कागदपत्रांची पूर्तता करण्यात अडथळे
यामुळे काही पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्यात विलंब होत आहे.
अर्ज कसा कराल?
इच्छुक कारागिरांनी खालील मार्गांनी अर्ज करू शकतात
महा-सेवा केंद्र
ग्रामपंचायत कार्यालय
अधिकृत ऑनलाइन पोर्टल
आवश्यक कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर लाभ मंजूर केला जातो.
पारंपरिक कारागिरांना सक्षम करण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. पात्र लाभार्थ्यांनी पुढे येऊन योजनेचा लाभ घ्यावा.- डॉ. प्रशांत शेळके, मुख्याधिकारी, खामगाव नगरपालिका
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही पारंपरिक कारागिरांसाठी आर्थिक आणि कौशल्य विकासाची सुवर्णसंधी ठरत असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यास महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
अधिक वाचा : e-NAM Scheme : डिजिटल योजना ठप्प! वसमत बाजारात पुन्हा जुनाच खेळ सुरू?
Web Summary : PM Vishwakarma Yojana supports traditional artisans with financial aid, skill training, and modern tools. Artisans receive loans up to ₹3 lakh at 5% interest, a ₹15,000 grant for tools, and a ₹500 daily stipend during training, boosting rural economies.
Web Summary : पीएम विश्वकर्मा योजना पारंपरिक कारीगरों को वित्तीय सहायता, कौशल प्रशिक्षण और आधुनिक उपकरण प्रदान करती है। कारीगरों को 5% ब्याज पर 3 लाख तक का ऋण, उपकरणों के लिए ₹15,000 का अनुदान और प्रशिक्षण के दौरान ₹500 का दैनिक वजीफा मिलता है, जिससे ग्रामीण अर्थव्यवस्था को बढ़ावा मिलता है।