Join us
Daily Top 2Weekly Top 5

31 मार्चपर्यंत केवायसी करा, अन्यथा गॅस सबसिडी मिळणार नाही, अशी करा घरबसल्या करा केवायसी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 18:20 IST

PM Ujjawala Yojana : म्हणून पुन्हा एकदा सर्वच गॅस कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांना महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे.

PM Ujjawala Yojana :    प्रधानमंत्री उज्वला गॅस योजने अंतर्गत महिला लाभार्थ्यांना वार्षिक नऊ सिलेंडरपर्यंत 14.2 किलोच्या सिलेंडरवर ३०० रुपयांपर्यंतची सबसिडी दिली जाते आणि ही सबसिडी बंद होऊ नये, म्हणून पुन्हा एकदा सर्वच गॅस कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांना महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे.

देशभरामध्ये जवळजवळ १० कोटी ५५ लाख पेक्षा जास्त लाभार्थी प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत लाभ घेत आहेत. यापैकी महाराष्ट्रामध्ये जवळपास ५५ लाखांपेक्षा अधिक लाभार्थी या योजनेत सहभागी आहेत. संबंधित लाभार्थ्यांना वर्षातून एकदा केवायसी करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने महत्वाची अपडेट समोर आली आहे. 

अनेक महिला लाभार्थ्यांना गॅस एजन्सीच्या माध्यमातून इण्डेन, भारत, एचपी या एजन्सीकडून केवायसी करण्यासाठी कॉल येत आहेत. मात्र महिला लाभार्थी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत केवायसी झाली नाही, तर अशा लाभार्थ्यांची सबसिडी बंद होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

ही केवायसी तुम्ही घरबसल्या सुद्धा करू शकता. 

  • यासाठी प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या पोर्टल वर जाऊन तुम्ही वापरत असलेल्या इण्डेन, भारत गॅस किंवा एचपी गॅस यापैकी एका गॅसचे ॲप डाऊनलोड करायचे आहे. 
  • या ॲपद्वारे तुम्हाला केवायसी करता येणार आहे.  
  • किंवा तुम्ही थेट त्या संबंधित पोर्टलच्या माध्यमातून देखील केवायसी करू शकतात. 
  • किंवा आपल्या गॅस डिस्ट्रीब्यूटरकडे जाऊन तुम्ही ऑफलाइन पद्धतीने देखील केवायसी करू शकतात. 
  • त्यामुळे या मार्च महिन्यातील ३१ तारखेपर्यंत तुम्ही ही केवायसी करता येणार आहे. 
  • अन्यथा तुम्हाला मिळणारी जी सबसिडी आहे, ती बंद होणार आहे.
English
हिंदी सारांश
Web Title : Complete KYC by March 31st or lose gas subsidy.

Web Summary : Ujjwala Yojana beneficiaries must complete KYC by March 31, 2026, to continue receiving gas subsidies. Update KYC online via the app or offline through your gas distributor to avoid subsidy termination.
टॅग्स :कृषी योजनाशेतकरी