Join us

PM Kisan 19th Installment : प्रतीक्षा संपली! या दिवशी मिळणार पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 21:26 IST

PM Kisan 19th Installment : अनेक दिवसांपासून पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी या तारखेची वाट पाहत होते.

PM Kisan 19th Installment : अखेर पीएम किसान योजनेच्या (PM Kisan 19th Installment) १९ व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली आहे. अनेक दिवसांपासून पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी या तारखेची वाट पाहत होते. पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता २४ फेब्रुवारी रोजी जारी होणार आहे. पंतप्रधान मोदी (PM Modi) बिहार येथून कोट्यवधी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २००० रुपये जमा करतील, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली आहे. 

पंतप्रधान मोदींनी या योजनेचा (PM Kisan Scheme) १८ वा हप्ता शेवटचा ५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील वाशिम येथून जारी केला होता. त्यावेळी पंतप्रधानांनी ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात २० हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित केली होती. पंतप्रधान किसान योजनेचा १९ वा हप्ता २४ फेब्रुवारी रोजी जारी केला जाईल. पंतप्रधान मोदी बिहारमधून २ हजार रुपये हस्तांतरित करतील. 

पंतप्रधान मोदी २४ फेब्रुवारी रोजी बिहारच्या दौऱ्यावर जाणार असून त्या दरम्यान पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता वितरित (PM Kisan Installment) करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही माहिती दिली. कर्पुरी ठाकूर यांच्या १०१ व्या जयंती कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते बिहारमधील समस्तीपूर येथे  होते. 

शेतकऱ्यांना इतके पैसे मिळालेप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (पीएम-किसान) २०१९ पासून, डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात ३.४६ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, ११ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना १८ हप्त्यांमध्ये हा लाभ मिळाला आहे. तसेच, केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण प्रयत्नांमुळे, १८ व्या हप्त्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ९.५८ कोटी झाली आहे.

अधिक माहितीसाठी, येथून मदत घ्या.पंतप्रधान किसान योजना ही केंद्र सरकारची योजना आहे, ज्याचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करते. या योजनेअंतर्गत, लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्यात प्रत्येकी २००० रुपये देण्याची तरतूद सरकारकडून आहे. याअंतर्गत संपूर्ण वर्षभरात ६ हजार रुपये दिले जातात. 

सरकार प्रत्येक हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बँक ट्रान्सफरद्वारे जमा करते. शेतकरी योजनेशी संबंधित कोणतीही माहिती पीएम किसान एआय चॅटबॉट 'किसान ई-मित्र' https://chatbot.pmkisan.gov.in द्वारे मिळवू शकतात. हे चॅटबॉट ११ भाषांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मातृभाषेत उत्तरे मिळू शकतात.

टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाशेती क्षेत्रशेतीकृषी योजना