Join us

PM Kisan Scheme : अखेर पीएम किसान हफ्त्याची तारीख ठरली, 'या' दिवशी खात्यात पैसे येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 10:23 IST

PM Kisan Scheme : गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी पीएम किसान च्या पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेत होते. अखेर पीएम किसान योजनेच्या २० व्या हफ्त्याची प्रतीक्षा संपली असून पुढील दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, असे स्पष्टीकरण कृषी मंत्रालयाकडून देण्यात आले आहे. (PM Kisan Scheme)

PM Kisan Scheme :  गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी पीएम किसान च्या पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेत होते. अखेर पीएम किसान योजनेच्या २० व्या हफ्त्याची प्रतीक्षा संपली असून पुढील दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, असे स्पष्टीकरण कृषी मंत्रालयाकडून देण्यात आले आहे. (PM Kisan Scheme)

पीएम किसानचा १९ वा हफ्ता फेब्रुवारीमध्ये वितरित केल्यानंतर शेतकऱ्यांना विसावा हप्ता कधी होईल याची प्रतीक्षा होती. याबाबत अनेकदा तर्कवितर्क लावण्यात येत होते. मात्र प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना निराशेला सामोरे जावे लागले. मात्र आता विसावा हप्त्याची तारीख ठरली असून येत्या ०२ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ता वितरित होणार आहे. (PM Kisan Scheme)

कारण २ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. येथील वाराणसीमध्ये एक मोठा कार्यक्रम घेणार असून मोदी उत्तर प्रदेशसाठी अनेक मोठ्या घोषणा करू शकतात. याच वाराणसी दौऱ्यात पीएम किसानचा २० वा हप्ता वितरित केला जाणार आहे. जवळपास साडेनऊ करोड पेक्षा अधिक शेतकरी बांधवांना या हप्त्याचे वितरण २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. (PM Kisan Scheme)

असे करा हफ्त्याचे स्टेटस चेक 

सर्वप्रथम पीएम किसान या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे. यानंतर पहिल्याच लिंकवर क्लिक करा. आपल्यासमोर अनेक ऑप्शन्स येतील यातील फार्मर कॉर्नर वरील नो युवर स्टेटस या पर्यावर क्लिक करा.

यावर क्लिक केल्यानंतर नवीन पेज दिसेल. या पीएम किसानचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा नोंदणी क्रमांक भरायचा आहे. त्यानंतर Captcha कोड टाकून घ्या. ओटीपी या बटणावर क्लिक करा. (जर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा नोंदणी क्रमांक माहीत नसल्यास तुम्ही (Know Your Registration Number)

 पर्यायावर क्लिक करून आधार किंवा मोबाईल नंबरद्वारे नोंदणी क्रमांक मिळू शकता.) मोबाईलवर ओटीपी आल्यानंतर तो ओटीपी पुन्हा रकान्यात भरावा आणि Get Data या बटनावर क्लिक करावे.

यानंतर आपल्यासमोर अर्ज करताना भरलेली संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल. तुम्हाला जर यातील काही माहितीत बदल करायचा असेल तर Update your Details बटणावर क्लिक करून तुम्ही ती अपडेट करू शकता.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : IMD चा यलो अलर्ट! राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाकेंद्र सरकारसरकारी योजनाशेतकरीशेती