Join us

PM Kisan : पीएम किसान 20 व्या हफ्त्यासह शेतकऱ्यांना कृषी मंत्रालयाकडून महत्वाचं आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 12:35 IST

PM Kisan : याबाबत १८, १९, २० जुलै पर्यंत हा हफ्ता वितरीत होईल, असेही सांगण्यात येत होते. मात्र शेतकऱ्यांची निराशाच झाली आहे. 

PM Kisan : पीएम किसानच्या २० वा हफ्ता (PM Kisan Scheme) कधी मिळणार या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. याबाबतच्या अनेकदा तारखांचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. मात्र अद्यापही तारखेबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तत्पूर्वी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आवाहन करण्यात आले आहे. 

पीएम किसान योजनेच्या २० व्या हफ्त्याचे (PM Kisan 20Th Installment) वितरण आज होईल, उद्या होईल या आशेवर शेतकरी आहेत. पीएम नरेंद्र मोदी बिहार येथील कार्यक्रमातून हा हफ्ता वितरित करणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र असे काही झाले नाही. याबाबत १८, १९, २० जुलै पर्यंत हा हफ्ता वितरीत होईल, असेही सांगण्यात येत होते. मात्र शेतकऱ्यांची निराशाच झाली आहे. 

अशातच केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे. ते असे की, शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सोशल मीडियावर पीएम-किसान योजनेच्या नावाखाली पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीपासून सावध रहा. सध्या अनेक शेतकऱ्यांना बनावट लिंक, कॉल्स, मॅसेज येत आहेत. अशा गोष्टीपासून दूर राहा. २० वा हफ्ता व इतर माहिती ही फक्त http://pmkisan.gov.in आणि @pmkisanofficial वर देण्यात येईल, अशी सूचना करण्यात आली आहे. 

पीएम किसान योजनेच्या नावाखाली सोशल मीडियावर अनेक खोटी माहिती आणि बनावट संदेश पसरवले जात आहेत. शेतकरी बांधवानो, तुमचे कष्टाचे पैसे ठेवा. खोट्या अफवांपासून दूर रहा, फक्त पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर याबाबत माहिती देण्यात येईल. शिवाय लवकरच पीएम किसानच्या हफ्त्याबाबत घोषणा करण्यात येईल, असेही स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

 

टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाकृषी योजनाशेती क्षेत्रशिवराज सिंह चौहान