PM Kisan Update : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (Pm Kisan Scheme) ही देशातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेपासून वंचित राहिलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना जोडले जात आहेत. पंतप्रधान किसान योजनेतून वगळलेल्या शेतकऱ्यांना जोडण्यासाठी मोहीम सुरु करण्यात येणार आहे.
पीएम किसान योजनेत लाखो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. अनेक शेतकरी आजही काही त्रुटींमुळे या योनेपासून वंचित आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने संधी दिली आहे. जे शेतकरी पात्र आहेत, परंतु अद्याप योजनेत सामील झालेले नाहीत. त्यांचे मागील हफ्ते मिळण्यास मदत होणार आहे. नव्याने योजनेत सामील होऊन लाभ घेता येणार आहे.
योजनेचा लाभ कसा मिळवायचा?जर तुम्ही शेतकरी असाल आणि अद्याप पंतप्रधान किसान योजनेत सामील झाला नसाल, तर सरकारने तुम्हाला आणखी एक संधी दिली आहे. सरकार १५ एप्रिल २०२५ पासून चौथी मोहीम सुरू करणार आहे, ज्यामध्ये नवीन पात्र शेतकरी जोडले जातील. म्हणजेच नवीन शेतकऱ्यांना नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही आवश्यक अटी घातल्या आहेत, यामध्ये शेतकऱ्याकडे शेतीयोग्य जमीन असावी. ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. पीएम किसान पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. जर तुम्ही या तीन अटी पूर्ण केल्या तर तुम्ही या योजनेचे लाभार्थी होऊ शकता.
अर्ज कसा करावा?जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर सोप्या स्टेप्स फॉलो करा:
- पीएम किसान पोर्टल (pmkisan.gov.in) वर जा.
- "नवीन शेतकरी नोंदणी" वर क्लिक करा.
- तुमचा आधार क्रमांक एंटर करा आणि OTP द्वारे पडताळणी करा.
- सर्व आवश्यक माहिती भरा आणि अर्ज सबमिट करा.
- काही दिवसांत तुमच्या अर्जाची स्थिती निश्चित करा.