PM Kisan 22nd Installment : केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत २२ वा हप्ता १३ मार्च रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला.(PM Kisan 22nd Installment)
यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे २ लाख ९० हजार शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळाला असला, तरी तब्बल ५ हजार ७०० शेतकरी अद्याप वंचित आहेत.(PM Kisan 22nd Installment)
आधार लिंक, ई-केवायसी आणि तांत्रिक अडचणींमुळे या शेतकऱ्यांच्या खात्यात २१ वा आणि २२ वा हप्ता जमा झालेला नाही.(PM Kisan 22nd Installment)
केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या या योजनेतून शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, योजनेच्या अटींची पूर्तता न झाल्यास लाभ मिळत नाही. जिल्ह्यातील अनेक शेतकरी याच कारणामुळे सलग दोन हप्त्यांपासून वंचित राहिले आहेत.(PM Kisan 22nd Installment)
२२ व्या हप्त्याचे वितरण पूर्ण, तरीही हजारो वंचित
मार्च महिन्यात २२ व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले असून पुढील हप्ता जून-जुलैदरम्यान मिळण्याची शक्यता आहे. परंतु तांत्रिक त्रुटींमुळे काही शेतकऱ्यांना सलग दोन हप्ते मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.
लाभार्थ्यांची संख्या आणि तफावत
जिल्ह्यात सन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे २ लाख २५ हजार ७०० लाभार्थी नोंदणीकृत आहेत. २१ व्या हप्त्याचा लाभ २ लाख २० हजार शेतकऱ्यांना मिळाला होता. मात्र, ५ हजार ७०० शेतकरी तांत्रिक कारणांमुळे लाभापासून वंचित राहिले आहेत. २२ व्या हप्त्यातही हीच स्थिती कायम आहे.
'ॲग्रीस्टॅक' आणि नवीन अटींचा परिणाम
आधार लिंक आणि ई-केवायसी या अटींसह आता 'ॲग्रीस्टॅक' नोंदणीवरही भर दिला जात आहे. या प्रक्रियेत सहभागी न झालेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी योजनेपासून दूर राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांसाठी काय उपाय?
ज्या शेतकऱ्यांना हप्ता मिळाला नाही, त्यांनी खालील प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी
* आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक करणे
* ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे
* तलाठ्याशी संपर्क साधून माहिती दुरुस्त करणे
ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर थकीत हप्त्यांचा लाभ मिळू शकतो.
शेतकऱ्यांमध्ये नाराजी
योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण करताना अनेक अडचणी येत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. 'शासन दिलासा देण्याची घोषणा करते; पण प्रत्यक्षात अटींचा अडसर येतो,' अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. तांत्रिक अडचणी दूर करून सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आर्थिक मदत ठरत असली, तरी तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांच्या पूर्ततेमुळे हजारो शेतकरी लाभापासून वंचित राहतात.
प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून या समस्या सोडवल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.
Web Summary : Many Yavatmal farmers haven't received their PM Kisan 22nd installment due to Aadhaar linking, e-KYC, and technical issues. Despite disbursement, thousands remain deprived, facing challenges with 'AgriStack' registration and unmet scheme requirements. Farmers are urged to complete pending processes to receive benefits.
Web Summary : आधार लिंक, ई-केवाईसी और तकनीकी समस्याओं के कारण यवतमाल के कई किसानों को पीएम किसान की 22वीं किस्त नहीं मिली है। वितरण के बावजूद, हजारों किसान 'एग्रीस्टैक' पंजीकरण और योजना की आवश्यकताओं को पूरा न करने जैसी चुनौतियों का सामना कर रहे हैं। किसानों से लंबित प्रक्रियाओं को पूरा करने का आग्रह किया गया है।