Join us

PM Kisan 19th Installment : पीएम किसानचा हफ्ता येणार की नाही? 'या' शेतकऱ्यांची निराशा होईल, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 20:49 IST

PM Kisan 19th Installment : काही शेतकऱ्यांचा १९ वा पीएम किसानचा हप्ता अडकू शकतो आणि तर कोणाला मिळेल ते जाणून घेऊया.... 

PM Kisan 19th Installment :  पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Scheme) १९ व्या हफ्त्या अंतर्गत ९.७ कोटी शेतकऱ्यांना २००० रुपयांचा १९ वा हप्ता मिळेल. पण काही शेतकरी असे आहेत ज्यांना यावेळी हप्त्याचा लाभ मिळणार नाही. याचे कारण काही नियमांचे पालन न करणे असू शकते. शेतकऱ्यांचा १९ वा हप्ता कोणत्या कारणांमुळे अडकू शकतो आणि हा लाभ कोणाला मिळेल ते जाणून घेऊया.... 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (पीएम किसान सन्मान निधी योजना) पात्र शेतकऱ्यांना १९ व्या (PM Kisan 19th Installment)  हप्त्याचा लाभ मिळणार आहे. हा हप्ता २४ फेब्रुवारी २०२५ रोजी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते वितरित केला जाईल. यावेळी पंतप्रधान मोदी बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधतील आणि हप्त्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यात डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) द्वारे पाठवली जाईल.

कोणत्या शेतकऱ्यांचा १९ वा हप्ता अडकू शकतो?

जमीन पडताळणी अपूर्णज्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची पडताळणी करता आली नाही किंवा ज्यांची जमीन पडताळणी अपूर्ण आहे, त्यांना १९ वा हप्ता मिळणार नाही. केवळ खऱ्या शेतकऱ्यांनाच फायदा मिळावा, यासाठी सरकारने ही पडताळणी अनिवार्य केली आहे.

ई-केवायसी न करणेजर एखाद्या शेतकऱ्याने अद्याप त्याचे ई-केवायसी केली नसेल, तर त्याला या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. सरकारने आधीच स्पष्ट केले होते की, लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. ई-केवायसी करण्यासाठी, शेतकरी जवळच्या सीएससी केंद्राला भेट देऊन किंवा योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in ला भेट देऊन ते पूर्ण करू शकतात.

आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला नाही.ज्या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांचे बँक खाते आधारशी लिंक केलेले नाही, त्यांचा हप्ताही अडकू शकतो. यासाठी शेतकऱ्याला त्याच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन आधार लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

बँक खात्यात डीबीटी सुविधा सक्रिय नाहीजर शेतकऱ्याच्या बँक खात्यात डीबीटी सुविधा सक्रिय केली नाही तर त्याच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले जाणार नाहीत. म्हणून, शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते डीबीटीसाठी तयार असल्याची खात्री करावी.

लाभार्थी यादी आणि पेमेंटची स्थिती कशी तपासायची?जर तुम्हाला तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही आणि तुमचा हप्ता आला आहे की नाही हे तपासायचे असेल... 

  • पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in ला भेट द्या.
  • 'लाभार्थी स्थिती' या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक प्रविष्ट करा.
  • नंतर, 'डेटा मिळवा' वर क्लिक करा.
  • यानंतर तुमची पेमेंट स्थिती स्क्रीनवर दिसेल.
  • जर तुमचे नाव यादीत नसेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी अधिकाऱ्यांशी किंवा स्थानिक सरकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाकृषी योजनाशेती क्षेत्रशेती