Join us
Daily Top 2Weekly Top 5

Pistachio Superfood : पिस्ता खाताना 'ही' चूक ठरू शकते धोकादायक वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 17:02 IST

Pistachio Superfood : फिटनेससाठी फायदेशीर मानला जाणारा पिस्ता खरंच आरोग्याचा मित्र आहे का, की अति सेवन केल्यास तोच वजनवाढीचा सापळा ठरू शकतो? जागतिक पिस्ता दिनानिमित्त तज्ज्ञांनी पिस्ता खाताना घ्यायची योग्य काळजी आणि प्रमाणाबाबत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. वाचा सविस्तर (Pistachio Superfood)

Pistachio Superfood : 'फिटनेस फ्रेंड' म्हणून ओळख मिळवलेला पिस्ता खरोखरच आरोग्यासाठी वरदान आहे की अति सेवन केल्यास तोच वजनवाढीचा ट्रॅप ठरू शकतो, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो.  (Pistachio Superfood)

तज्ज्ञांच्या मते, पिस्त्याचे फायदे जितके महत्त्वाचे आहेत, तितकीच त्याच्या सेवनाबाबतची सावधगिरी आवश्यक आहे. (Pistachio Superfood)

दरवर्षी २६ फेब्रुवारी रोजी जागतिक पिस्ता दिन साजरा केला जातो. पिस्त्याचे पोषणमूल्य आणि आरोग्यदायी फायदे याबाबत जनजागृती करणे हा या दिवसामागील उद्देश आहे.  (Pistachio Superfood)

सुकामेव्यांमध्ये पिस्ता हा चव आणि पोषण यांचा उत्तम संगम मानला जातो.

पिस्त्याचे पोषणमूल्य आणि फायदे

पिस्त्यात प्रथिने, फायबर आणि चांगले फॅट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे तो शरीरासाठी अनेक प्रकारे उपयुक्त ठरतो.

* हृदयासाठी हितकारक : पिस्त्यातील चांगले फॅट्स कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

* वजन नियंत्रण : फायबर आणि प्रथिनांमुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते, त्यामुळे अनावश्यक खाणे कमी होते.

* डोळ्यांसाठी लाभदायक : ल्युटीन आणि झेक्सँथिन हे अँटिऑक्सिडंट्स दृष्टीसाठी उपयुक्त ठरतात.

* त्वचा व केसांसाठी फायदेशीर : व्हिटॅमिन ईमुळे त्वचेचा तजेला टिकून राहतो.

* मधुमेह नियंत्रण : कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे रक्तातील साखर संतुलित ठेवण्यास मदत होते.

तज्ज्ञांच्या मते, पिस्ता शरीराला ऊर्जा देतो, स्नायू बळकट करतो आणि मेंदूच्या कार्यक्षमतेसाठीही उपयुक्त ठरतो.

अतिसेवनाचे दुष्परिणाम

पिस्ता पौष्टिक असला तरी त्याचे अति सेवन टाळणे आवश्यक आहे.

* जास्त प्रमाणात सेवन केल्यास वजन वाढण्याची शक्यता

* पोट फुगणे किंवा अपचन

* जास्त मीठ असलेल्या भाजलेल्या पिस्त्यांमुळे रक्तदाब वाढण्याचा धोका

* काही व्यक्तींमध्ये ॲलर्जीची लक्षणे दिसू शकतात

दररोज सुमारे २५ ते ३० ग्रॅम म्हणजेच एक मूठभर पिस्ते सेवन करणे योग्य मानले जाते.

तज्ज्ञांचा काय आहे सल्ला

पिस्ता हा पौष्टिक सुकामेवा असला तरी तो प्रकृतीनुसार आणि मर्यादित प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे. विशेषतः जास्त मीठ असलेले किंवा तळलेले पिस्ते टाळावेत.- डॉ. देवराव कांबळे, जनरल फिजिशियन

योग्य प्रमाणात सेवन केल्यास पिस्ता आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो; मात्र अतिरेक टाळणे हेच खरे आरोग्याचे सूत्र असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

हे ही वाचा सविस्तर :Melghat Orange Palash : अविश्वसनीय नजारा! मेळघाटात पळसाच्या बहराने जंगल केशरी

अधिक वाचा: Melghat Coffee Story : महाराष्ट्रात १५० वर्षांची कॉफी परंपरा; मेळघाटात दरवळतो 'अरेबिका'चा सुगंध

English
हिंदी सारांश
Web Title : Pistachio Superfood: Benefits, risks, and recommended intake for optimal health.

Web Summary : Pistachios offer protein, fiber, and healthy fats, benefiting heart health, weight management, and vision. Moderation is key to avoid weight gain, digestive issues, and potential allergic reactions. Experts recommend around 25-30 grams daily for optimal health benefits.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीआरोग्य