नाशिक : खरीप हंगाम २०२५-२६ करिता प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत (Pik Vima Yojana) जिल्ह्यातील ३ लाख ६२ हजार ९४० शेतकऱ्यांनी ३१ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत विमा काढला. सीएससी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गर्दी झाली. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सर्व्हर डाउन असल्याने अनेक शेतकरी विमा भरू शकले नाहीत.
नाशिक जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये अजूनही पावसामुळे मशागत व पेरणीची कामे रखडली आहेत. जेथे पेरणी झाली आहे, तेथे सततच्या पावसामुळे पीक नुकसान होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना विमा योजनेंतर्गत सहभागी होण्याचे आवाहन केले होते.
कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी गावोगावी जाऊन योजनेची माहिती व प्रचार प्रसिद्धी केली. जनजागृतीमुळे मोठ्या संख्येने शेतकरी योजनेंतर्गत सहभागी झाले. मागील वर्षी केवळ एक रुपयात पीक विमा उपलब्ध झाल्यामुळे ५ लाख ९१ हजार ३७४ शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता. मात्र, यावर्षी सहभागात घट झाली आहे. शेतकऱ्यांनी भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कारळे, कापूस व कांदा या पिकांसाठी विमा उतरवला आहे.
सहभागासाठी मुदत वाढवली
सुधारित पीक विमा योजनेकडे अनेक शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. या योजनेची मुदत ३१ जुलैपर्यंत होती. मायंत्र या कालावधीत खूपच कमी शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्या अनुषंगाने सरकारकडून या योजनेची मुदत वाढण्यात आली असून आता १४ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
Pik Vima Yojana : पीक विमा योजनेची मुदत वाढवली, आता 'या' तारखेपर्यंत करता येईल अर्ज