Join us

Pik Vima Yojana : शेतकऱ्यांना मिळणार पॉलिसी, काय आहे पीक विमा पॉलिसी अभियान? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 16:59 IST

Pik Vima Yojana : आता १ फेब्रुवारीपासून मोहीम राबवून विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना पॉलिसी (Pik Vima Policy) वितरित करणार आहे.

Pik Vima Yojana : पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत (Pik Vima Yojana) मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी त्यांच्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मोहरी इत्यादी पिकांचा विमा (Crop Insurance) उतरवला आहे. यासाठी सरकारने शेवटची तारीख १५ जानेवारी निश्चित केली होती. त्याचबरोबर, सरकार आता १ फेब्रुवारीपासून मोहीम राबवून विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना पॉलिसी (Pik Vima Policy) वितरित करणार आहे.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने केंद्र आणि राज्य सरकारांच्या सहकार्याने चालणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजने (PMFBY) बाबत एक मोठी अपडेट दिली आहे. कृषी विभाग १ फेब्रुवारीपासून 'मेरी पॉलिसी मेरे हाथ' (Meri Policy Mere Hath) नावाची मोहीम राबवून पीक विमा योजने अंतर्गत विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना विमा पॉलिसी वितरित करणार आहे.

चालू रब्बी हंगामात (Rabbi Season) अनेक पिकांवर सुरक्षा कवच देण्यासाठी केंद्राने पीक विमा योजने अंतर्गत विमा घेण्यास सांगितले होते, त्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२५ होती. आता सहाय्यकांमार्फत ई पीक पाहणी करण्यात येते. 

PMFBY पोर्टल आणि WhatsApp वर माहिती मिळवाशेतकरी पॉलिसीमध्ये काही तफावत किंवा तक्रार असल्यास, ते पंतप्रधान पीक विमा योजना पोर्टल https://pmfby.gov.in ला भेट देऊन किंवा १४४४७ वर कॉल करून माहिती मिळवू शकतात. याशिवाय, शेतकरी PMFBY च्या व्हॉट्सअॅप चॅटबॉट क्रमांक 7065514447 वर संदेश पाठवून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देखील मिळवू शकतात. तसेच तुम्ही तुमची विमा पॉलिसी येथून सहजपणे डाउनलोड करू शकता.

सरकार २०२५-२६ पर्यंत पीकविमा योजना१ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत, मंत्रिमंडळाने २०२५-२६ पर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि हवामान आधारित पीक विमा योजना सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे. त्याचे एकूण बजेट ६९ हजार ५१५.७१ कोटी रुपये आहे. विमा योजनेतील तांत्रिक सुधारणांसाठी ८२४.७७ कोटी रुपयांच्या खर्चासह फंड फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी (FIAT) स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

टॅग्स :पीक विमाशेती क्षेत्रकृषी योजनाशेतीशेतकरी