Pik Vima Hafta : पीक विमा योजनेअंतर्गत, सोमवारी म्हणजेच ११ ऑगस्ट २०२५ रोजी राजस्थानातील झुंझुनू येथे विमा दाव्याचे पेमेंट वितरित करण्यात आले. केंद्रीय कृषी मंत्री याच्या उपस्थितीत हे वितरण करण्यात आले आहे. यातील ९२१ कोटी रुपयांच्या पीक विम्याची रक्कम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.
पंतप्रधान पीकविमा योजनेतील गेल्या वर्षीचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जात आहे. याबाबत केंद्रीय कृषिमंत्र्यांनी संकेत दिले होते. त्यानुसार आज राजस्थान येथील आयोजित कार्यक्रमात त्यांनी पहिल्या टप्प्यातील पीक विम्याचे वाटप केले आहे.
थेट डीबीटीद्वारे पैसे ट्रान्स्फर केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी DBT द्वारे ३,९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त पीक विमा दाव्याची रक्कम ३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट डिजिटल पद्धतीने पाठवण्यात आली. यामध्ये, राजस्थानमधील ७ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ११०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाली. राज्यनिहाय विमा दाव्याअंतर्गत, मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना ११५६ कोटी रुपयांचा थेट फायदा झाला. छत्तीसगडमधील शेतकऱ्यांना १५० कोटी रुपये आणि उर्वरित राज्यांतील शेतकऱ्यांना ७७३ कोटी रुपये मिळाले.
१.८३ लाख कोटी रुपयांची दाव्याची रक्कम वाटपशिवराज सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत ७८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या अर्जांना १.८३ लाख कोटी रुपयांची दाव्याची रक्कम वाटप करण्यात आली आहे, तर शेतकऱ्यांनी प्रीमियम रक्कम म्हणून फक्त ३५,८६४ कोटी रुपये भरले आहेत. सरासरी दाव्याच्या ५ पट जास्त, हे सरकारच्या शेतकरी-अनुकूल धोरणाचे प्रतीक आहे.